Spread the love

नृसिंहवाडी / महान कार्य वृत्तसेवा 

नृसिंहवाडी येथील दत्त महाराजांच्या राजधानीत बेकायदेशीर गावठी दारू विक्री सुरू असून शिरोळ पोलिसांनी खुलेआम याला परवानगी दिली आहे का अशी चर्चा दत्त महाराजांच्या नगरीत ऐकायला मिळत आहे. 

नृसिंहवाडी हे श्री क्षेत्र दत्त महाराजांची राजधानी असल्याने या ठिकाणी दारू विक्री पूर्णपणे बंद आहे. या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक गोवा येथून दत्त दर्शना करता येत असतात. याचा नाहक त्रास विशेष करून दत्त दर्शना करता आलेल्या महिला भक्तांना होत आहे. येथील नागरिकांनी याबाबत तक्रार केली आहे. जयसिंगपूर विभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळुंके या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या कर्तव्य पोलिस अधिकारी रोहिणी सोळुंके यांनी येथील सुरू असलेल्या गावठी दारू विक्री बंद करतील अशी अपेक्षा दत्त भक्ता मधून आहे. एकंदरीत येथील गावठी दारू विक्री विरोधात  दत भक्त नाराज असून येणाऱ्या काळात येथे सुरू असलेली गावठी दारू विक्री बंद न झाल्यास रस्त्यावर उचलून आंदोलन करणार असल्याची चर्चा येथे आहे.