मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे मुंबईत एकत्र आल्याचं पाहायला मिळाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भाच्याचं आज लग्न होतं. या लग्न सोहळ्यानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण कुटुंब एकत्र पाहायला मिळाले. यावेळी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, रश्मी ठाकरे देखील उपस्थित होते.
मुंबईतील दादरमधील राजे शिवाजी विद्यालयात लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी लग्नाला राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहिले. लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळाले. तसेच दोघांमध्ये काही संवाद देखील झाला. नुकतीच राज ठाकरेंनी रश्मी ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नाला हजेरी लावली होती.
ठाकरे बंधुंनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी एकत्र यावे-
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला अवठाकरे बंधुंनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी एकत्र यावेघ्या 20 जागांवर विजय मिळवला. तर 128 जागा लढवणार्या मनसेला एकाही जागेवर उमेदवार निवडून आला नव्हता. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधुंच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधुंनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी एकत्र यावे, अशी चर्चा सुरु झाली आहे.
ठाकरे ब्रॅण्ड टिकविण्यासाठी दोन्ही बंधू एकत्र येणार-
ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवे, अशी भावना सध्या मराठी जनतेची आहे. मनसे आणि ठाकरे गटाची विधानसभा निवडणूकीत वाताहात झाल्यानंतर आता राज आणि उद्धव या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावेत यासाठी सजामाध्यमांवर चर्चा सुरू झाल्या आहेत. मनसे आणि ठाकरे गटाचे तळागाळातील काही कार्यकर्ते देखील याबाबत खासगी बोलत आहेत. ’एक रहेंगे, तो सेङ्ग रहेंगे, ठाकरे ब्रॅण्ड टिकविण्यासाठी दोघांनीही एकत्र यायलाच हवे, दोन्ही बंधूंनी महाराष्ट्रासाठी एकत्र यावे, अशी प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.