Spread the love


औरंगाबाद,18 मार्च
मराठा चळवळीतून न्याय देणार असून पुढील दिशा ठरवण्यासाठी 24 मार्च रोजी अंतरवाली येथे महत्त्वाची बैठक आहे. तिथे भव्य मंडपात अंतिम बैठक आणि ठोस बैठक असेल असे जरांगे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे सरकार समोर नवा पेच निर्माण करणार असल्याचा इशारा यावेळी दिल्याचे बोलले जात आहे.
प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान : जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असे मत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले होते. त्यावर बोलताना मी त्यांच्या शब्दाचा सन्मान करतो. ते नेहमी जे बोलतात ते स्पष्ट बोलतात; मात्र राजकारण माझा मार्ग नाही. सामाजिक चळवळीतून न्याय मिळवणे हाच माझा मार्ग आहे. सामाजिक चळवळीतून सत्तेत आणि राजकारणात नसताना ज्या गोष्टी मिळणार नाही त्या मिळाल्या. सरकारने आमची वारंवार फसवणूक केली. आरक्षण आज देतो, उद्या देतो म्हणून आमची फसवणूक केली. आचारसंहिता लागण्यापूर्वी झालेल्या बैठकीत सगेसोयरे बाबत निर्णय जाहीर करू असं म्हणाले. मात्र त्याची घोषणा नसल्याने आमची पुन्हा फसवणूक झाल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय.
महत्त्वाची बैठक घेऊन निर्णय : 24 तारखेला आम्ही राज्यातील मराठा समाजाची बैठक अंतरवाली येथे घेणार असून या बैठकीत आम्ही आमची पुढची दिशा ठरवणार आहे. या बैठकीला राज्यातील सर्व तज्ञ हजर राहणार आहेत. इथे प्रचंड मोठी बैठक असणार आणि निर्णायक बैठक असणार आहे. आचारसंहिता लागण्याच्या अगोदर मराठा आरक्षणावर निर्णय घेणार होते; मात्र घेतला नाही, अशी खंत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.
तर आम्ही सरकारला कायद्याने खेटणार : 24 तारखेला अंतिम बैठक आणि निर्णय मराठा समाजाचा असणार आहे. एक मताने ठोस निर्णय घ्यायचा आहे. सरकार कायद्याने खेटत असेल तर आम्ही देखील आता सरकारला कायद्याने खेटणार आहोत आणि यावर 24 तारखेला निर्णय होईल. 900 एकरमध्ये आमची सभा होणार आहे. ती कुठे घ्यायची त्याचाही निर्णय या बैठकीत घेऊ. ठोस निर्णय झाल्याच्या नंतर सरकारला कळणार आहे की, आपण सग्यासोयèयांची अंमलबजावणी केली असती तर बरे झाले असते, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी मांडले.