Spread the love


शरद पवार गटाला ‌’राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार‌’ हे नाव मिळाले आहे. शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने हे नाव दिलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‌‍वभूमीवर हे नाव देण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाच्या चिन्हावर मात्र अद्याप काही निर्णय झालेला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे गेल्यानंतर शरद पवार गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला काही पर्याय द्यायचे होत्ो. त्यामध्ये शरद पवार गटाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार , नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार ही तीन नावं दिली होती. त्यामध्ये निवडणूक आयोगाने ‌’नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार‌’ म्हणजे ‌’राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार‌’ हे नाव त्यांना दिलं आहे.


अजित पवारांसोबत कोण?

  • महाराष्ट्रातील 41आमदार
  • नागालँडमधील 7आमदार
  • झारखंड 1आमदार
  • लोकसभा खासदार 2
  • महाराष्ट्र विधानपरिषद 5
  • राज्यसभा 1

  • शरद पवारांसोबत कोण?
  • महाराष्ट्रातील आमदार 15
    केरळमधील आमदार 1
    लोकसभा खासदार 4
    महाराष्ट्र विधानपरिषद 4
    राज्यसभा -3
    पाच आमदारांनी व एका खासदाराने दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.