Spread the love


बारामती,4 फेबुवारी
बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‌‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने बारामतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्‌‍वभूमीवर आज (4 फेब्रुवारी) अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी बोलताना अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर नाव न घेता टीका केली आहे. ”एकीकडे अजित त्ुाम्हाला सांगतात असे करा, दुसरीकडे वरिष्ठ सांगतात तसे करा सांगतात. मग त्ुाम्ही कोणाचे ऐकणार? माझी त्ुाम्हाला एकच विनंती आहे की, त्ुाम्ही इतके दिवस वरिष्ठांचे ऐकले, आता माझे ऐका” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या जनत्ोला केले आहे.
माझ्या विचारांचा खासदार निवडून द्या : आज अजित पवारांनी बारामती आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत माझ्या विचारांचा खासदार निवडून द्या, असं आवाहनदेखील उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. बारामतीत राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्धाटनप्रसंगी पवार यांनी हे आवाहन केलंय. ”खासदार निवडणून दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी बोलून ‌’मी‌’ मतदारसंघासाठी भरीव निधी आणू शकेन. आतापर्यंत मी राज्य सरकारसाठी काम करत आलो. मात्र, आता केंद्र सरकाकडून बारामतीसह मतदारसंघातील इतर तालुक्यांसाठी निधी आणता येईल. आतापर्यंत किती आमदार, खासदार आले आणि गेले. किती आमदार-खासदार आपल्या अवतीभवती होऊन गेले? पण आमच्या अडचणीत आम्हाला कोण मदत करतंय, याचाही विचार करायला हवा”, असं पवार म्हणाले.
मी उमेदवार समजून मतदान करा : ”मला काही लोकांची गंमत वाटत्ो, मी काहीना अध्यक्ष, उपाध्यक्ष केले. करोडो रुपयांची जागा नाममात्र दराने घेऊन दिली. कधीही कुठली अडचण येऊ दिली नाही. मात्र काय झाला माहीत नाही. त्यांचे जोरात काम चालले आहे. काही जण मला मुंबईत भेटले. आमची चूक झाली. दादा, त्ुामच्याशिवाय कुणी काम करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले. काहींची तर अडचण मला समजू शकत्ो, असेही अजित पवार म्हणाले.
विकासकामे करणारा खासदार आपल्याला हवा : त्ुामच्या विचाराचा खासदार असेल तर, विकास कामे लवकर होतील. नुसता इकडं-तिकडे न फिरता विकासकामे करणारा खासदार आपल्याला हवा आहे, असेही उपमुख्यमंर्त्यांनी म्हटंल आहे.