Spread the love


शहाड,30 जानेवारी
एका 32 वर्षीय बायकोने आपला नवरा शारीरिक सुख देत नसल्याच्या आरोप करत पोलिसांत तक्रार दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील हायप्रोफाईल वस्ती असलेल्या शहाड परिसरात घडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात 40 वर्षीय नवरा हा नपुंसक असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे लग्नापूर्वी बायकोला शारीरिक सुख देऊ शकत नाही असे माहिती असूनही नवऱ्याने ही माहिती आपणास लग्नापूर्वी दिली नाही. आपल्याशी लग्न करून आपणास शरीर सुखापासून वंचित ठेवले, असे तक्रारीत नमूद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 32 वर्षाची तक्रारदार महिला ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एका दुर्गम असलेल्या गावात कुटुंबासह राहणारी आहे. तिचे लग्न नात्ोवाईकांच्या ओळखीत्ूान कल्याण पश्चिम मधील शहाड येथील एका 40 वर्षाच्या तरूणा बरोबर गेल्या वर्षी जूनमध्ये झाले आहे.लग्नापूर्वी विवाहित्ोच्या नात्ोवाईकांनी त्ुाम्ही विवाहासाठी 40 वर्षांचेही होऊन सुद्धा का थांबले असे विचारले त्ोव्हा त्यावेळी नवऱ्याने आपण सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात होतो म्हणून आपणास विवाहास विलंब झाला, असे कारण दिले होत्ो. तसेच तक्रारदार बायकोने नवरा शिकलेला आहे म्हणून त्याला पसंत केले होत्ो. विशेष म्हणजे, या दोघांचे लग्न मोठ्या थाटात नाशिक जवळील इगतपुरी भागात पार पडले. मात्र, लग्नानंतर नवरा विक्षिप्तपणे वागत असल्याचे तक्रारदार बायकोला आढळले. तिने नवऱ्याला भावनिक नात्याद्दल समजून सांगितले. परंत्ुा नवऱ्यामध्ये काही दोष आहेत हे तक्रारदार बायकोला निदर्शनास आले. ती सुरूवातीला अस्वस्थ होती. या अस्वस्थेतमधून ती शहापूर तालुक्यातील माहेरी निघून गेली.
दरम्यान, नवरा आणि सासरच्या मंडळींच्या आग्रहामुळे ती परत माहेरी आली. तिला नवऱ्यामधील भावनिक दोष प्रकर्षाने दिसून आले. घरात असताना नवऱ्याच्या पिशवीत तो डॉक्टरांकडून काही औषधे घेत असल्याचे आढळले. तिने गुपचूप संबंधित डॉक्टरकडे जाऊन विचारणा केली. त्यावेळी डॉक्टरने नवऱ्यामध्ये काही भावनिक दोष आहेत. त्यासाठी त्ो हे औषधे घेत असल्याचे सांगितले. यामुळे नवऱ्याकडून आपणास कधीही शरीरसुख मिळणार नाही याची खात्री पटल्यावर नवरा नपुसंक आहोत हे माहिती असूनही आपला विश्वासघात आणि फसवणूक केल्याची तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात 32 वर्षीय पत्नीने केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एन.घस्त्ो करत आहेत.