Spread the love


मुंबई,30 जानेवारी
वंचित बहुजन आघाडीचा औपचारिकरित्या महाविकास आघाडीत समावेश करण्यात आला. याबाबतचं महाविकास आघाडीने अधिकृत पत्र जारी केलं आहे. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होणार की नाही याच्या चर्चा रंगल्या होत्या. गुरूवारच्या बैठकीत मानापमान नाट्यही रंगलं होतं. वंचितच्या प्रतिनिधींना बाहेर तासभर उभं केल्याने मविआने अपमान केल्याचा आरोपही वंचिततर्फे करण्यात आला होता. मात्र अखेर आज वंचितचा मविआत समावेश करत असल्याचं पत्र जारी करण्यात आलं.
गुरुवारी झालेल्या मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले होत्ो. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामील व्हावं यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमत झालं असून वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.
महाविकास आघाडीची पुढची बैठक ही 2 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी वंचितच्या वतीने प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर हे स्वत: त्यासाठी हजर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अद्याप पत्र पाहिलं नाही
वंचितची महाविकास आघाडीमध्ये सामील करण्यासंदर्भात अधिकृत पत्र जारी करण्यात आलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला अद्याप अधिकृत पत्र प्राप्त झालं नाही, त्ो मिळाल्यावर भूमिका मांडू असं म्हटलं.
मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत वंचित महाविकास आघाडीमध्ये सामील होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी बैठकीचं आमंत्रण आल्याचं जाहीर केलं होतं. त्यांच्यावतीनं आज बैठकीसाठी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर पोहोचले. त्यांच्याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत, विनायक राऊत, राष्ट्रवादीचे जित्ोंद्र आव्हाड, जयंत पाटील, अनिल देशमुख आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोलेंसह वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. लोकसभेच्या दृष्टीनं आज झालेली बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली.