जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावांमध्ये मराठा आरक्षणाची मागणी घेऊन आंदोलकांच्याकडून 29 ऑगस्ट पासून अत्यंत शांततामय मार्गाने आमरण उपोषणाच आंदोलन चालू होतं. शुक्रवारी सायंकाळी चर्चा करण्यासाठी म्हणून आलेल्या पोलिसांच्या कडून अचानक आंदोलकांच्यावर बळाचा वापर करून लाठी हल्ला करून गोळीबार, अश्रुदराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आणि आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला गेला त्यामध्ये अनेक आंदोलक बायका मुलासह जबर जखमी झाले . या अमानवी घटनेचा सैनिक टाकळी परिसरातील सकल मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एक होत निषेध नोंदवला
यावेळी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणांनी परिसर दणाणून सोडत आरक्षणाची मागणी केली. आजपर्यंत मराठा समाजाने आरक्षणासंदर्भात अत्यंत शांततेच्या मार्गाने आपले आंदोलन चालू ठेवले आहे. पण सरकार आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रक्रियेत अडकून ठेवून अशा पद्धतीने बळाचा वापर करून आंदोलन मोडून काढणार असेल तर सरकारने मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नये! असा इशाराही देण्यात आला . यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील ,महादेव इंगळे सर, अमर पाटील, संजय गायकवाड, विकास पाटील ,अरुण इंगवले, विजय पाटील ,रशीद मुल्ला राजू पाटील, शिवाजी बाबर, सुरेश भोसले इत्यादी उपस्थित होते.