काकांची सभा यशस्वी करण्यासाठी उद्योगपतीची केविलवाणी धडपड
कोल्हापूर महान कार्य वृत्तसेवा
मंत्री हसन मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांना शह देण्यासाठी शुक्रवारी कोल्हापुरात काका शरद पवार यांच्या सभेसाठी अपेक्षित गर्दी होणार नसल्याचा अंदाज आल्यानंतर पाचशेला हजार घ्या पण गाडीत बसा चहा, नाष्टा, जेवण असा येतोचित सन्मान करा असा फतवा जिल्ह्यातील एका उद्योगपतीने गुरुवारी रात्री काढला. काही करा पण काकांची सभा यशस्वी करूया माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. अशी केविलवाणी साद बारामतीने पोसलेल्या उद्योगपतीने कार्यकर्त्यांना घातली आहे. हातकणंगले शिरोळ तालुक्यात याची चर्चा रंगली आहे. रेल्वे स्टेशन समोरील एका आलिशान इमारतीतून याची सूत्रे हालतात असल्याची चर्चा आहे. या उद्योगपतीने बारामतीच्या आशीर्वादाने कोल्हापुरात अनेक भानगडी केल्याची या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे.