Spread the love


मुंबई,22 ऑगस्ट
अभिनेते प्रकाश राज यांना चांद्रयानाबद्दल टवीट करणं भोवलं आहे. चांद्रयान मोहिमेची खिल्ली उडवल्याप्रकरणी प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिंदू संघटनांच्या नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध कर्नाटकमधील बागलकोट जिल्ह्यातील बनहट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
प्रकाश राज यांनी काय टवीट केले होते?
प्रकाश राज यांनी त्यांच्या टिवटर हँडलवरुन इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांचे व्यंगचित्र शेअर केले होते. ज्यामध्ये के सिवन हे चहा ओतताना दिसतात. ‘चंद्रावरून विक्रम लँडरने पाठवलेला पहिला फोटो, वॉव’ असे म्हणत त्यांनी हे व्यंगचित्र शेअर केले आणि चांद्रयान-3 ची खिल्ली उडवली. त्यानंतर नेटकरी संतापले आणि त्यांना ट्रोल केले होते.
प्रकाश राज यांचे दुसरे टवीट
’’द्वेष करणाèयांना फक्त द्वेष दिसतो. मी आर्मस्ट्राँग टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या विनोदाचा संदर्भ देत होतो, जे आमच्या केरळच्या चहा विक्रेत्याचा आनंद साजरा करत होते. ट्रोल्सनी कोणत्या चहा विक्रेत्याला पाहिले? जर तुम्हाला विनोद समजला नसेल तर हा विनोद तुमच्यावर आहे, मोठे व्हा’’ असे प्रकाश राज यांनी म्हटले आहे.
दरम्यान, प्रकाश राज हे अनेक सामाजिक व राजकीय घटनांवर टिवटर आपली मतं मांडत असतात. बèयाचदा ते त्यांच्या भूमिकेमुळे ट्रोलही होतात. त्यांच्या या टवीटनंतर ‘प्रकाश राज कधीही द्वेषाचा तुमच्यावर एवढा प्रभाव पडू देऊ नका की तुम्हाला तुमच्या देशाची आणि तुमच्या लोकांची प्रगती आणि प्रयत्नांचा तिरस्कार वाटेल’, अशा प्रतिक्रिया नेटकèयांनी दिल्या होत्या.