मुंबई 22 ऑगस्ट
केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. तसेच 2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल असेही फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमितशाह तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्याशी फडणवीस यांनी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली.
धनंजय मुंडेंची पियूष गोयलांशी चर्चा सुरु असतानाच फडणवीसांनी जाहीर केला निर्णय
एकीकडे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे कांदा प्रश्ननी तोडगा काढण्यासाठी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट कांदा प्रश्ननी तोडगा निघाल्याचे जाहीर केले. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जपानमधून केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पियुष गोयल यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. काही वेळापूर्वीच कांदा प्रश्नी तोडगा काढल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून टिवट करत त्यांनी जाहीर केलं. त्यामुळं एकंदरीतच अजित पवार गटावर सरशी करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी तर केला नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यानंतर शेतकèयांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. तात्काळ केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द करावा, अशी मागणी शेतकèयांकडून केली जात आहे. कांदा उत्पादक शेतकèयांचा मुद्दा लक्षात घेता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली. यानंतर केंद्र सरकार 2 हजार 410 रुपये प्रतिक्विंटल भावाने नाफेड मार्फत शेतकèयांचा दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. धनंजय मुंडे यांनी टवीटरद्वारे याबाबतची माहिती दिली.