Spread the love

मुंबई,2 जून

अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षाला आणि मविआ सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीत फुट पडणार नाही, असे शरद पवार म्हणाले होते मात्र आता राष्ट्रावादीत फुट पडली आहे. अजित पवारांसोबत 30 आमदारांचा पाठिंबा आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आमदारांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी टवीट करत दिली आहे.

संजय राऊतांनी टिवटमध्ये काय लिहिलेय?

महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले, ‌’मी खंबीर आहे. लोकांचा आपल्याला पाठिंबा आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.‌’. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही.‌‘, असे राऊत यांनी टिवटमध्ये लिहिले आहे. या टिवटच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार आणि शरद पवार हे खंबीर असल्याचे ते महाराष्ट्रातील राजकारण्यांना आणि जनतेला भासवत आहे. जनता हा खेळ फार काळ सहन करणार नसल्याचंदेखील त्यांनी टिवटमार्फत सांगितले आहे.