Spread the love

त्यांचाच गट राष्ट्रवादी पक्ष होणार?

मुंबई,2 जून

महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाला एक वर्ष पूर्ण होत असतानाच पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा शक्तीशाली राजकीय भूकंप झाला आहे. मागीलवेळी भाजपकडून टार्गेट उद्धव ठाकरे यांची शिवसेना होती, तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस राहिली. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला अखेर राष्ट्रवादी फोडण्यात यश आलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 30 आमदारांसह भाजपशी हातमिळवणी केली असून त्यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीकडून 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये राष्ट्रवादी स्थापनेपासून शरद पवारांचे जे विश्वासार्ह शिलेदार समजले जातात त्याच चेहऱ्याचा समावेश असल्याने राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. यामध्ये शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले छगन भुजबळ, कोल्हापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पेटल यासारखे मातब्बर चेहरे अजित पवारांसोबत गेल्याने राष्ट्रवादीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

30 आमदारांच्या पाठिंब्यांचे पत्र राजभवनावर दिले

त्यामुळे गेल्या वर्षभरापासून जो शिवसेनेमधील बंडाळीनंतर शिवसेनेत पक्षामध्ये जो आम्हीच शिवसेना असा राजकीय खेळखंडोबा सुरु आहे अगदी त्याच पद्धतीने आता राष्ट्रवादीमध्येही सुरु होणार का? या संदर्भात चर्चा सुरू झाली आहे. कारण 50 पैकी 30 आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे पत्र राजभवनावर दिले आहे. त्याचबरोबर अजित अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच पक्ष प्रतोद आणि विधानसभा उपाध्यक्षांनी सुद्धा पाठिंबा दिला असल्याने त्यांचाच गट हा राष्ट्रवादी असेल असा दावा केला जाईल, असे बोलले जात आहे. जी पद्धत भाजपने शिवसेना फोडण्यासाठी वापरली त्याच पद्धतीने राष्ट्रवादी फोडण्यासाठी वापरली आहे.

त्यामुळे एकंदरीत आता दोन पक्ष एक वर्षभरात भाजपने सत्तेसाठी फोडले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळेच समीकरण तयार झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकारणामध्ये भाजप पडद्यामागून खेळी तर करत नाही ना? अशी शक्यता वर्तवली जात होती. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते असूनही आक्रमक न होणे, विधानसभेमध्येही आक्रमक न होणे या मुद्द्यांवरुन अजित पवार संशयाच्या भोवऱ्यात होते. पक्षातील घडामोडीवरूनही ते नाराज होते. मात्र, संशयाच्या भोवऱ्यात का होते त्याचे उत्तर आज राजकीय प्रश्नांमधून मिळाले आहे.

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा करणार?

त्यामुळे एकंदरीत अजित पवार राष्ट्रवादीवर दावा करणार नाहीत ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दोन तृतीयांश आमदार फुटल्याने या सर्व प्रकरणावर आता शरद पवार कोणती भूमिका घेणार? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.