Spread the love

मुंबई,2 जून

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये अजित पवार यांच्यासह 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत शरद पवारांच्या नेतृत्वाला रामराम केला आहे. अजित पवारांनी चार वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या 37 आमदारांचा पाठिंबा असल्याचे समोर आले आले आहे.

अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाशी शपथ घेतली, त्यांना कोणती मंत्रिपदे मिळणार? याची चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांच्याकडे उप मुख्यमंत्रिपदासह जलसंपदा हे खाते असेल, असा अंदाज वर्तवला जातोय. अजित पवार यांच्या गटातील आमदारांना मिळणाऱ्या मंत्रिपदाबाबतची माहिती समोर आली आहे. कोणत्या मंत्र्याला कोणती मंत्रिपदे मिळू शकतात ते पाहूयात.

अजित पवारांच्या गटाला मिळणारी संभाव्य मंत्रिपदे कोणती ?

अजित पवार : जलसंपदा

छगन भुजबळ : अन्न व नागरी पुरवठा

दिलीप वळसे पाटील : ऊर्जा

हसन मुश्रीफ : कौशल्य विकास

धनंजय मुंडे : गृहनिर्माण

आदिती तटकरे : महिला व बालकल्याण

संजय बनसोडे : पर्यटन

अनिल पाटील : लाभक्षेत्र विकास प्राधिकरण

धर्मरावबाबा आत्राम : आदिवासी कल्याण