मुरगूड : महान कार्य वृतसेवा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी कोल्हापूर येथील समाज कंटक तरुणांनी आक्षेपार्ह स्टेट्स ठेवून सामाजिक शांतता बिघडण्याचा प्रयत्न केला आहे अशा दोषीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी तसेच येथून पुढे असे प्रकार करणाऱ्यांची गय केली जाऊ नये याबाबतचे निवेदन मुरगूड मधील समस्त मुस्लिम समाजाच्या वतिने करण्यात आली तसेच सदर घटनेचा तिव्र शब्दात जाहीर निषेध करणेत आला. यावेळी मुरगुडचे एपीआय विकास बडवे यांच्या सोबत पीएसआय कुमार ढेरे यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी बोलताना बाळासाहेब मकानदार म्हणाले,काही समाज कंटक तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेट्स ठेवून दोन समाजांत तेढ व अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे . आपला कोल्हापूर जिल्हा हा छत्रपती शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांवर चालणारा जिल्हा आहे . अशा घटना जिल्ह्यात वारंवार होत आहेत. अशा प्रकाराला कायम स्वरूपी आळा घालण्यासाठी असे कृत्य करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी . हिंदू – मुस्लिम समाज एकत्रितपणे गुण्यागोविंदाने नांदत असतांना अशा प्रकाराने सामाजिक अशांतता निर्माण होत आहे . असे प्रकार करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.
याप्रसंगी मुरगूड मधील समस्त मुस्लिम समाज अशा समाजकंटकाचे समाज कदापी समर्थन करणार नाही, तसेच असे कृत्य करणाऱ्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी सर्वांनी एकत्र येत केली .
यावेळी राजू मुजावर, बाबासाहेब नदाफ, जमिर शिकलगार, सोहेल नदाफ,जावेद शिकलगार, मोहसीन सय्यद , बशीर नदाफ,सलमान मुल्ला,अल्ताफ मुल्ला, मनिकखान जमादार. सलीम बागवान आदीसह मुरगूड मधील मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते .