Spread the love


मुंबई,9 जून
तुझा लवकरच दाभोळकर होणार‘ अशी धमकी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टवीटरवर देण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कायदा सुवस्थेवर मला विश्वास आहे, त्यामुळे याची मला चिंता नाही, असे शरद पवार म्हणाले.
कोणत्याही प्रश्नावर मत देण्याचा अधिकार या जनतेच्या प्रत्येक नागरिकाला आहे आणि असं असताना धमक्या देऊन कुणाचा आवाज बंद कराल असे वाटत असेल तर हा गैरसमज आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे, त्यामुळे मला चिंता नाही. पण ज्यांच्या हातात राज्यातील सुत्रे आहेत.. त्यांना जबाबदारी टाळता येत नाही, असे शरद पवार म्हणाले.
धमकीची मला कोणतीही चिंता नाही. कायदा आणि व्यवस्थेची जबाबदारी ज्यांना देण्यात आली आहे, ज्यांच्यावर आहे, त्यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही, असे शरद पवार नाही.
राज्य सरकारकडून गंभीर दखल –
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना टिवटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाèयांशी मी स्वत: बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत, असे टवीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेय.
शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, असेही शिंदे म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करुन धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
शरद पवारांना मिळालेल्या धमकीचा तपास केला पाहिजे. महाराष्ट्रात दडपशाही आणि गुंडाराज सुरु आहे. मी देशाच्या गृहमंत्र्यांकडे न्याय मागत आहे. भविष्यात काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री असतील, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर तक्रारीची दखल घेत कडक कारवाई करण्याची मागणी सुळे यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानेही मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले ?
आदरणीय शरद पवार साहेब यांना काही समाजकंटकानी सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी दिली आहे. राज्यात सध्या ठिकठिकाणी असणाèया दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यात, महिलांच्या हत्या आणि बलात्कार यांचं पेव फुटल आहे. जातीय हत्यांचं पिक आल्यासारख झाले आहे. त्यात आता पवार साहेबांना मारण्याची धमकी. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे किती धिंडवडे निघाले आहेत,हे यातून दिसून येते. राज्य सरकार याला गांभीर्याने घ्यावे.आणि योग्य ती कारवाई करुन राज्यात कायद्याचं राज्य अजूनतरी अस्तित्वात आहे,हे दाखवून द्यावे.