आंदोलन अंकुश कडून उभारण्यात येणारा हा काटा डिजिटल पद्धतीचा असणार आहे राज्यात सर्वच साखर कारखान्यांचे काटे हे ऍनॉलॉक पद्धतीचे आहेत त्यात वजनात फेरफार करण्यास वाव असतो पण नवीन तंत्रज्ञान व प्रगत सॉफ्टवेअर चा वापर असलेला डिजिटल वजन काटा आम्ही उभारणार आहोत तो उसाचे वजन करणारा राज्यात पहिलाच वजन काटा असेल असे धनाजी चुडमुंगे यांनी यावेळी सांगितले.
उसाचे वजन करणारा राज्यातील पहिलाच वजन काटा
शिरोळ : उसाच्या वजनातील काटा मारी रोखण्यासाठी आंदोलन अंकुश संघटने मार्फत शिरोळ येथे नृसिंहवाडी रोडवर लोकवर्गणीतून शेतकरी वजन काटा उभारला जात आहे त्याचा काल सायंकाळी पायाभरणी कार्यक्रम पार पडला.
शिरोळ नृसिंहवाडी रोडवर असलेल्या रामचंद्र गेंडे पुजारी यांच्या जागेत रविवार सायंकाळी पाच वाजता पायाभरणीचा कार्यक्रम टाकळी येथील ज्येष्ठ माजी सैनिक शेतकरी श्री. अशोक पाटील आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते पायाभरणीचा विधिवत पूजा करून प्रारंभ करण्यात आला .
यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी वजनकाट्याचे काम जलद गतीने पूर्ण करून येत्या गळीत हंगामाच्या सुरुवातीला काटा चालू करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि वजन काटाउभारणी साठी शेतकऱ्यांनी तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन केले . या काट्यावर शेतकऱ्यांना ऊस वजनासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच परिसरातील सर्व साखर कारखान्यांच्या वर या वजन काट्या मुळे वचक बसेल व ऊस वजनात होणारी फसवणूक थांबून शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे या कार्यक्रम प्रसंगी सांगितले.
यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे सर्व पदाधिकारी व शेतकरी सहकुटुंब उपस्थित होते.