Spread the love


पुण,31 मे (पीएसआय)
गेल्या काही दिवसापासून राज्यभर चर्चेचं आणि गर्दीच केंद्र राहिलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नावावरून वाद पाहायला मिळत आहे. आता यावर पुणे जिल्ह्यातील आमदार आणि माजी खासदार यांच्यात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्याचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि शिरूर मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात गौतमी पाटील यांच्या आडनावावरून आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे.
मोहिते पाटील यांनी केले विधान : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील म्हणाले की, मला काही पत्रकारांनी गौतमी पाटील हिच्या आडनावावरून विचारले तेव्हा मी म्हणालो की, दिलीप कुमार यांचे नाव देखील वेगळे होते.अनेक कलाकारांचे नाव हे बदलले गेले. पण कधीही काही शंका आली नाही. आता गौतमी पाटील हिने पाटील केले आहे तर काय बिघडले आहे. कलाकार हा कलाकार आहे. तिचे आयुष्य इतक्या लवकर संपवू नये अशी माझी विनंती आहे. तसेच आज अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमाला परवानगी दिली जात नाही, का तर तिच्या कार्यक्रमाला गर्दी जास्त होते. आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला देखील एवढी गर्दी होत नाही, जेवढी तिच्या कार्यक्रमाला गर्दी होते. असे विधान मोहिते पाटील यांनी केले होते.
अनेक कलाकारांचे नाव हे बदलले गेले. पण कधीही काही शंका आली नाही. गौतमी पाटील हिने पाटील केले आहे तर काय बिघडलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला देखील एवढी गर्दी होत नाही, जेवढी तिच्या कार्यक्रमाला गर्दी होते. – मोहिते पाटील
आढळराव पाटील यांची टिका: त्यांच्या या विधानावर शिरूर मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, खेडचा आमदार एक वादग्रस्त विधान करणारा अज्ञानी आमदार आहे. कोणावरही काहीही नसताना आरोप करने ही त्याची जुनी सवय आहे. गौतमी पाटील हीची तुलना राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर करणे हे चुकीचे आहे. तो अज्ञानी असून तो वेढ्याच्या नंदनवनामध्ये जगत आहे. आपण भानात राहून टीका करावी. आम्ही देखील उद्या गौतमी पाटील हिचे किती फॉलोवर आहे आणि पवार साहेब आणि सुप्रिया सुळे यांचे किती आहे. हे काढू शकतो. पण आम्ही त्यातले नाही, अशी टिका यावेळी पाटील यांनी केली आहे.