मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
राज्य सरकारची गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. कारण नोकरदार वर्गातील बोगस लाभार्थ्यांचे सरकारी पगार थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांना सरकारने मोठा दणका दिला आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशीच बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट संकेत दिले होते. बेकायदा लाभ घेणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांच्या लाडकी बहीण योजना आता अंगलट येणार आहे. कारवाई संदर्भात ग्रामविकास विभागाकडून कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहे. बोगस लाभार्थी नोकरदार महिलांकडून आता वसुली करण्यात येणार आहे. एवढच नाही तर शिक्षा म्हणून वेतनवाढ आणि पदोन्नती रोखली जाण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक घोटाळे झाले. योजनेसाठी अपात्र असलेल्या अनेकांना या योजनेचा लाभ घेतला, यामुळे सरकारचे मोठे नुकसान झआले. एवढच नाही तर या योजनेसाठी शासनाच्या विविध विभागांचा निधी वळवल्याची तक्रार सातत्याने होत आहे, याची गंभीर दखल घेत लाडक्या बहिणींच्या जवळपास 2 लाख अर्जांची छाननी करण्यात आली. या योजनेत अनेक बोगस लाडक्या बहिणींची पोलखोल झाली आहे आहे .
विशेष म्हणजे सरकारी नोकरीत गलेलठ्ठ पगार घेऊनही, काही महिलांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे पैसे खाल्ल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे. सरकारनं या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, कठोर कारवाईची तयारी सुरू केली आहे. अनेक महिला कर्मचारी पात्र नसतान देखील त्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. महिला व बाल विकास विभागाने पाठवलेल्या यादीमध्ये एकूण 1983 महिलांची नावे आहेत. या सर्व महिला जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत आहेत.
