Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

टीम इंडियाने 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मिळवलेल्या विजयामागे सूर्यकुमार यादवने घेतलेला एक अविश्वसनीय झेल निर्णायक ठरला. त्याने डेव्हिड मिलरचा घेतलेला हा झेल विजयाचा टर्निंग पॉइंट मानला जातो. साऊथ अफ्रिकेचा पराभव करून टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. सूर्यकुमार यादवच्या कॅचमुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव अडचणीत आला आणि भारताने 7 रन्सनी रोमांचक विजय मिळवत 17 वर्षांनंतर टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. अशातच आता अंबाती रायडूने या विषयी खळबळजनक खुलासा केला आहे.

बॉऊंडी मागं केली गेली होती

अंबाती रायुडूने शुभांकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक खुलासा केलाय. अंबाती रायुडू मॅचमध्ये काय झालं होतं? यावर भाष्य केलं. ”झालं असं की, वर्ल्ड फीड कॉमेंटेटर्स ब्रेकमध्ये खुर्ची ठेवतात आणि त्याच्यावर स्क्रीन लावतात, जेणेकरून ब्रॉडकास्टर्स काय चाललंय हे नीट पाहू शकतील. त्यामुळे त्यांनी बॉऊंडी थोडी मागं केली गेली होती आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा तशीच ठेवली. त्यामुळे आपल्यासाठी बॉऊंडी थोडी मोठी झाली होती. आम्ही वरून पाहत होतो, ती देवाची कृपा होती.”

रोप जर थोडा आतमध्ये असता तरी देखील सूर्याने बॉन्ड्रीच्या मागे जाऊन कॅच घेतला असता, असंही अंबाती रायडू याने म्हटलं आहे. यामध्ये कुणाचीही चुकी नव्हती. तो एक क्लिन कॅच होता. यामध्ये त्यांची चुकी नव्हती ना आपली चुकी होती. शेवटी देवाची साथ होती आणि बुमराहची… असं अंबाती रायडू याने म्हटलं आहे.

फायनलमध्ये काय झालं होतं?

फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 16 रन्सची गरज होती. हार्दिक पांड्याच्या पहिल्याच बॉलवर डेव्हिड मिलरने लाँग ऑफच्या दिशेने एक उंच फटका मारला. बॉल बाउंड्रीच्या पलीकडे जाईल असं वाटत होतं, पण सूर्यकुमार यादवने त्याचा पाठलाग केला आणि बाउंड्री लाइनजवळ तोल सांभाळत हवेत उडी घेतली. त्यानं बॉल पकडला, पण बाउंड्रीच्या आत परत येण्याआधी त्याने तो बॉल पुन्हा हवेत उडवला. त्यानंतर तो बाउंड्रीच्या आत परत आला आणि पुन्हा बॉल पकडून कॅच पूर्ण केला.