Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

शिल्पा शिरोडकरच्या कारला एका बसने टक्कर दिली आहे. ज्यानंतर गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 13 ऑगस्ट रोजी शिल्पाच्या कारचा अपघात झाला आहे. अपघातात तिच्या कारच्या सगळ्या काचा फुटल्या आहेत. या अपघातात कोणी जखमी झालं आहे की याची माहिती समोर आलेली नाही.

शिल्पाने काही फोटो शेअर केलेत. ज्यात कारच्या मागच्या काचा फुटून चक्काचूर झाला आहे. शिल्पाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, ”आज सिटीफ्लोच्या एका बसने माझ्या कारला टक्कर दिली. मुंबई ऑफिसचे प्रतिनिधी मिस्टर योगेश कदम आणि मिस्टर विलस मनकोटे यांनी मला सांगितलं की, याची जबाबदारी कंपनीची नाही तर ड्रायव्हरची आहे. हे लोक किती निर्दयी आहेत. एक ड्रायव्हर किती कमावू शकतात.”

शिल्पाने पुढे लिहिलंय, ”मुंबई पोलिसांचे धन्यवाद. त्यांनी कोणताही त्रास न देता तक्रार नोंदवून घेण्यात माझी मदत केली. पण कंपनीने या घटनेची कोणतीही जबाबदारी घेण्यास नकार दिला. सिटी फ्लो या प्रकरणात माझ्याशी जोडले गेलात यासाठी तुमचे धन्यवाद. देवाचे आभार की माझा स्टाफ ठीक आहे आणि त्याला कोणतीही इजा झाली नाही. पण काहीही झालं असतं.”