‘ती’ जागा भाड्याने द्या..! ; आयुक्तांनी प्रस्ताव धुडकावून लावल्याचं समजतं
इचलकरंजी विशेष प्रतिनिधी /महान कार्य वृत्तसेवा
जंग जंग पछाडूनही वाहन पार्किंगसाठी जागा मिळत नसल्याने अखेर ‘आप्पा’ने नमते घेतले असून गेले काही वर्षांपासून फुकटात वापरत असलेली महापालिकेची ‘ती’ जागा भाड्याने तरी द्या, अशी केविलवाणी विनंती करीत ‘अप्पा’ने चक्क महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर लोटांगण घातल्याचे समजते. यासाठी ‘अर्थपुर्ण’ चर्चेचाही प्रस्ताव ठेवल्याचे ऐकिवात आहे. तथापि महापालिकेने हा प्रस्ताव फेटाळून लावण्याच ही कळते.
‘आप्पा’ ने जबरदस्तीने, दंडगावा करून अतिक्रमित केलेली जागा सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर हा गंभीर प्रकाश समोर आला. त्यानंतर मोजक्या माध्यमांनी हा विषय लावून धरला. त्यामुळे नाईलास्तव महापालिकेला प्ले ग्राउंडसाठी आरक्षित असलेली ‘ती’ जागा ताब्यात घेणे भाग पडले. जागा ताब्यात घेत असताना ‘आप्पा’ने अनेक करामती केल्या. काहीही करून जागा सोडायची नाही यासाठी मोठा ‘अर्थिक’ घटाटोप केला. परंतू हा विषय लावून धरलेल्या माध्यमांच्या करड्या नजरेमुळे ‘आप्पा’ला अपयश आले.
त्यामुळे महापालिकेने जागा ताब्यात घेऊन कंपाउंड करून जागा सिल केली. त्यानंतर मात्र आर्थिक ताकदीवर काहीही करू शकतो या अविर्भावात असलेल्या ‘आप्पा’चा माज उतरला. जंग जंग पछाडुनी कोणी पार्किंगसाठी जागा दिलेली नाही. शेजारी पाजाऱ्यांचा रोष लक्षात आल्यानंतर नरमलेल्या ‘आप्पा’ने महापालिकडे गयावया करून सिल केलेली जागा भाडेतत्त्वावर द्या. ‘लागेल ती किंमत मोजतो’ अशी विनंती केल्याची कळते.
या सर्व घडामोडींवर गेले आठ दिवसांपासून हा विषय लावून धरलेली माध्यमं वॉच ठेवून होते. त्यामुळे महापालिकेलाही फारशा हालचाली करता आलेल्या नाहीत. म्हणून सदरचा प्रस्ताव धुडकावल्याचे समजे. कदाचित सोमवारपर्यंत ‘आप्पा’ला याचे उत्तर टपाली पोस्टाने किंवा हॉड डिलीव्हीरी पोहचेल अशी व्यवस्था महापालिकेने केल्याचे समजते. (क्रमश:)
