Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मुंबईहून कोलकाताकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. प्रवासादरम्यान एका प्रवाशाला अचानक पॅनिक अटॅक आला. यावेळी त्याच्या शेजारी बसलेल्या दुसऱ्या प्रवाशाने त्याला कोणतीही मदत न करता उलट त्याला चापट मारली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेक युजर्सनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. इंडिगोने त्यांर्च्या ें म्हणजेच ट्विटरवर माहिती देताना सांगितले की, चापट मारणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, अशाच स्वरूपाची आणखी एक घटना थ्ल्षूप्रहेर एअरलाइन्सच्या म्यूनिखहून बँकॉककडे जाणाऱ्या विमानात घडली. एका नवरा-बायकोच्या वादामुळे या विमानाची आपत्कालीन लँडिंग दिल्लीत करण्यात आली. या घटनांमुळे विमानप्रवासात असलेल्या नियमांचे पालन करणे किती गरजेचे आहे हे पुन्हा एकदा समोर आलं आहे.

विमानामध्ये प्रवास करताना कोणते नियम पाळावे लागतात?

आपण अनेकदा विमानाने प्रवास करतो. पण आपल्याला प्रवासात कोणते नियम पाळावे लागतात हे माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. विमानात प्रवास करताना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध नियम आणि कायदे लागू करण्यात आले आहेत. प्रवासादरम्यान खालील गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे असते.

ज्वलनशील वस्तूंवर बंदी – पेट्रोल, डिझेल, गॅस किंवा फटाके यांसारख्या ज्वलनशील वस्तू विमानात नेण्यास सक्त मनाई आहे. यामुळे अपघाताची शक्यता असते. तसेच चाकू, कात्री, ब्लेड अशा वस्तू विमानात नेण्यास मनाई आहे. अशा वस्तूंचा वापर दहशतवादी किंवा गुन्हेगारी उद्देशाने होऊ शकतो. बंदूक, रायफल, पिस्तूल हे देखील नेल्यास त्या व्यक्तीला थेट पोलिसांच्या ताब्यात दिले जाते. शिवाय अशा प्रवाशांवर भविष्यातील हवाई प्रवासावर बंदी घातली जाऊ शकते.

गोंधळ घालणे किंवा भांडण करणे कायद्याच्या विरोधात

विमानात इतर प्रवाशांशी भांडणे, मारहाण करणे, गोंधळ घालणे यावर कडक कारवाई केली जाते. अशा प्रवाशांवर दंड, तुरुंगवास किंवा फ्लाइट बॅनची शिक्षा होऊ शकते. विमानात गैरवर्तन करणाऱ्यांवर डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या नियमानुसार कारवाई केली जाते. यामध्ये: पहिल्या वेळेस त्रास दिल्यास 3 महिन्यांपर्यंत प्रवास बंदी. पुन्हा गंभीर वर्तन आढळल्यास 6 महिन्यांपासून ते कायमस्वरूपी प्रवासबंदी. फौजदारी गुन्हा दाखल करून तुरुंगवासाची शक्यता. त्यामुळे विमान प्रवास करत असताना केवळ आपल्या नव्हे तर इतरांच्या सुरक्षेचाही विचार करणे ही प्रत्येक प्रवाशाची जबाबदारी आहे.