मालेगाव / महान कार्य वृत्तसेवा
मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे . केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवलं जाऊ शकत नाही त्यामुळे सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे असं एनआयएच्या विशेष न्यायालयाने सांगितलं . 29 सप्टेंबर 2008 साली मालेगावमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणात 6 निरपराध नागरिकांचे प्राण गेले तर शंभरहून अधिक जण गंभीर जखमी झाले होते .या निकालानंतर निर्दोष सुटलेल्या साध्वी प्रज्ञा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे . तेरा दिवस मला टॉर्चर करण्यात आलं .माझा आयुष्य उध्वस्त केलं . मी सतरा वर्ष अपमानित झाले .मला स्वत:च्याच देशात आतंकवादी ठरवण्यात आलं .संन्यासी आहे म्हणून मी जिवंत आहे अशी प्रतिक्रिया साध्वी प्रज्ञा यांनी दिली .
काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञा ?
मालेगाव स्पोर्ट प्रकरणी आज न्यायालयाने अंतिम निकाल दिला .यामध्ये सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली . निर्दोष सुटकेनंतर साध्वी प्रज्ञा म्हणाल्या, ‘जेव्हा पहिल्यांदा चौकशीला बोलावलं होतं तेव्हा मी माणुसकीच्या नाते न्यायचा सन्मान करून मी आले होते . 13 दिवस मला टॉर्चर करण्यात आलं माझं आयुष उध्वस्त केलं .मी 17 वर्ष अपमानित झाले .मला आतंकवादी बनवलं स्वत:च्याच देशात ..ज्यांनी मला हे दिवस आणले त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही .संन्यासी आहे म्हणून मी जिवंत आहे . आरोपीच्या पिंजऱ्यात साध्वी प्रज्ञा भावूक झाल्या .
हिंदुत्वाला आतंकवादाचा नाव देणाऱ्यांना ..
संन्यासी संतदेखील सतत मरते आहे . यांनी देवाला कलंकित केलं . निर्णयानंतर साध्वी प्रज्ञांनी न्यायाधीशांचे आभार मानले .मला ऐकल्याबद्दल मला समजून घेतल्याबद्दल आभार . भगव्याला आंतकवादी म्हटलं . भगव्याचा विजय झाला . हिंदुत्वाचा विजय झाला .ज्यांनी हिंदुत्वाला आतंकवादाच नाव दिलं त्यांना कधी माफ केलं जाणार नाही. असेही साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटलं .
कोणा कोणाला आरोपी ठरवले होते–
1. प्रसाद पुरोहित
2. साध्वी प्रज्ञासिंह
3. समीर कुलकर्णी
4. रमेश उपाध्याय
5. अजय राहिरकर
6. सुधाकर द्विवेदी
7. सुधाकर चतुर्वेदी
8. रामजी कालसंग्रा – फरार
9. शामजी साहू – फरार
10. संदीप डांगे – फरार
11. प्रविण तकलकी – फरार
12. राकेश धावडे – फरार
