यड्राव / महान कार्य वृत्तसेवा
यड्राव (ता. शिरोळ) येथील माजी ग्रा.पं.सदस्य, पार्वती औद्योगिक वसाहतीचे संचालक महावीर ऊर्फ बंडू पाटील यांची दक्षिण भारत जैन सभा इचलकरंजी येथील दिगंबर जैन बोर्डींगच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. सन 2025 ते 2028 या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, चेअरमन संजय शेटे, व्हा. चेअरमन अभिनंदन पाटील, मुख्यमहामंत्री अनिल बागणे, खजिनदार बाळासाहेब पाटील, संघटन मंत्री शशिकांत राजोबा आदींच्या स्वाक्षऱ्या असलेले अधिकृत निवडपत्र देण्यात आले आहे.
महावीर पाटील हे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी विविध उपक्रमांद्वारे समाजसेवेचे कार्य केले आहे. माजी आरोग्य राज्यमंत्री, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या कार्याची ठसा उमटविला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे.
पाटील यांच्या निवडीमुळे यड्रावसह व परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
