Spread the love

नंदुरबार / महान कार्य वृत्तसेवा

संकटामध्ये सापडलेल्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी  आता शनिदेवाच्या चरणी धाव घेतली आहे.शनिमांडळ येथील शनी मंदिरात माणिकराव कोकाटे पूजा करणार आहेत. विरोधकांच्या आरोपांच्या साडीसातीपासून सुटका व्हावी यासाठी पूजा करणार असल्याची माहिती आहे.  राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. देशातील एकमेव शनि देवाचे साडेसाती मुक्त स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनिमांडळ येथील शनी मंदिरात कोकाटे दर्शन घेऊन पूजा अर्चा केली असल्याचं समोर आलं आहे.

गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेली विरोधकांच्या आरोपांच्या साडेसातीपासून मुक्ती मिळावी म्हणून मंत्री कोकाटे यांनी दर्शन घेतले. शनी मंदिरात जाऊन शनि देवाची विधिवत पूजा करत विरोधकांच्या साडेसातीतून मुक्ती मिळावी म्हणून या साडेसाती मुक्ती ठिकाणाला भेट देत आहेत. शनिवारी शनि देवाची साडेसाती मुक्ती ठिकाणी पूजा केल्याने मागे लागलेली इडा पिडा दूर होत असल्याची भाविकांची भावना आहे. शेतकऱ्याबाबत केलेलं वक्तव्य किंवा विधीमंडळात रमी खेळतानाचा त्यांचा व्हायरल व्हिडीओ असेल, यामुळे ते विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांच्यावर आरोपांची राळ उडवली जात आहे, तर  त्यांचा राजीनामा घेतला जाण्याची दाट शक्यता देखील वर्तवली जात आहे. कारण मंगळवारी त्या संदर्भात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आपल्या मागची इडा पिडा टळावी यासाठी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आता शनिदेवाला साकडं घातलं आहे, त्याचबरोबर शनिमांडळ येथील शनी मंदिरात कोकाटे दर्शन घेऊन पूजा अर्चा करणार असल्याचं समोर आलं आहे.

राज्याचे कृषिमंत्री आणि पालकमंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. देशातील एकमेव साडेसाती मुक्त स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनिमांडळ येथील शनिमंदिरात ते दर्शन घेऊन पूजा अर्चा केली. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोपांच्या साडेसातीपासून सुटका मिळवण्यासाठी ही पूजा केली आहे. शेतकऱ्यांबद्दलचे वक्तव्य आणि विधीमंडळात पत्ते खेळतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ यामुळे माणिकराव कोकाटे जोरदार चर्चेत आहेत. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मंगळवारी या संदर्भात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागे लागलेला तसेमिरा सुटावा आणि आरोप थांबावे यासाठी मंत्री कोकाटे यांनी शनिदेवाला साकडं घातलं आहे. भाविकांची अशी भावना आहे की शनिवारी शनिदेवाची साडेसाती मुक्ती ठिकाणी पूजा केल्याने मागे लागलेली इडापीडा दूर होते. मंत्री माणिकराव कोकाटे यांनी साडेसाती पासून मुक्ती मिळावी व विरोधकांच्या आरोपांपासून सुटका व्हावी म्हणून साडेसाती मुक्ती स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनिमांडळ येथील शनि महाराज मंदिरात अभिषेक आणि पूजा अर्चा करून विरोधकांवर विजय मिळावा अशी प्रार्थना केली आहे. लवकरच कोकाटेंच्या राजीनाम्याबाबतचं चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

शरद पवारांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात या शनिश्वराच्या दर्शनाने केली

नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ येथील शनी मंदिर देशातील एकमेव साडेसाती मुक्तपीठ म्हणून म्हणून ओळख आहे. अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या जीवनाची राजकीय सुरुवात याच मंदिराच्या दर्शनापासून केले आहे. शनी देव हा राजकीय क्षेत्राचा गुरु असल्याने त्यामुळे अनेक राजकीय नेते या ठिकाणी येऊन गेले आहेत. संकटात सापडलेल्या राजकीय नेत्यांना या ठिकाणाहून ऊर्जा मिळत असते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी ही आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात या शनिश्वराच्या दर्शनाने केली होती, त्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी या ठिकाणी भेट ही दिल्याच  पुजाऱ्यांनी सांगितले आहे. संकटात सापडल्यानंतर आणि चारही बाजूंनी टीका होत असताना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनि देवाच्या चरणी नतमस्तक होऊन विरोधकांच्या साडेसातीतून आपल्याला मुक्ती मिळावी अशी प्रार्थना केली आहे. एकूणच वादग्रस्त विधानानंतर कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात न दिसणारे माणिकराव कोकाटे आज नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ या ठिकाणी शनी मंदिरात आल्याने अनेक चर्चांना उधाण आले.