इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 675 वा संजीवन समाधी महोत्सव इचलकरंजी येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. संत नामदेव सांस्कृतिक भवन येथे बुधवारी दुपारी 12 वाजता समाधी निरुपण सोहळा संपन्न झाला.
येथील संत नामदेव सांस्कृतिक भवन येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 675 व्या संजीवन समाधी महोत्सवा निमित्त गुरुवार 15 जुलैपासून नामदेव गाथा पारायण आयोजित करण्यात आले होते. सप्ताह काळात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.बुधवार 23 रोजी ह.भ.प. सदगुरु सदाशिव म्हेत्रे दादा महाराज यांनी समाधी निरुपण सादर केले. सौ व श्री राजन उरूणकर यांच्या हस्ते श्री संत नामदेव महाराजांची महाआरती करण्यात आली. यावेळी शहर आणि परिसरातील समस्त शिंपी बांधव उपस्थित होते. गुरूवारी सकाळी 9 वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून दिंडी सोहळा संपन्न होणार आहे असे कळवण्यात आले आहे.
