Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मुंबई उपनगरातील मानखुर्द  परिसरात एका लहान मुलाच्या अंगावर एका विकृत व्यक्तीने पिटबुल कुत्रा सोडल्याची घटना समोर आली आहे. या कुत्र्याने मुलाचा चावा घेतल्यामुळे तो जखमी झाला आहे. केवळ विकृत आनंद मिळवण्यासाठी मालकाने मुलाच्या अंगावर कुत्रा सोडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

मानखुर्द विभागातील हमजा खान या 11 वर्षाच्या मुलाला पिटबुल जातीच्या कुत्र्याद्वारे चावा घेण्यास लावून याचा तमाशा पाहत , मज्जा घेत त्याचा व्हिडिओ बनविणाऱ्या मोहम्मद सोहेल खान (वय 43) विरोधात मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मानखुर्दच्या म्हाडा कॉलनी परिसरात हा प्रकार घडला. यावेळी हमजा खान हा एका रिक्षात खेळत असताना तिथे सोहेल त्याचा पिटबुल हा कुत्रा घेऊन आला. त्याने पिटबुल कुत्रा (झ्ग्ू ंल्त्तब ्‌‍दु) हमजाच्या अंगावर सोडला. या कुत्र्याने हमजाच्या मानेला आणि हनुवटीला चावा घेतला. हमजा रिक्षातून पळल्यावर सोहेलने हा कुत्रा त्याच्या मागे सोडला. कुत्र्याने या मुलाला ठिकठिकाणी चावा घेतला.मुलगा भयभीत झाल्यावर कुत्रा दूर करण्याऐवजी सोहेल जोरजोरात हसू लागला आणि याचा व्हिडिओ ही बनवला. याबाबत मुलाने त्याच्या वडिलांना माहिती दिली असता त्यांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.  मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये मोहम्मद सोहेल हसन खान याच्याविरोधात बीएनएसच्या कलम 35 (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद सौहेल हसन खान हा तिथलाच स्थानिक रहिवासी असून एसी दुरुस्तीचे काम करतो. माझ्यावर कुत्र्याने हल्ला केल्यावर मोहम्मद सोहेल हसत होता, असे हमजा खान याने सांगितले. आम्ही खेळत होतो, तेव्हा तो पिटबुल घेऊन आला. सगळे जण घाबरून पळाले, पण मी अडकलो. कुत्रा मला चावला, माझे कपडेही फाटले. हे सगळं पाहताना कुत्र्याचा मालक हसत होता, असे हमजा खान याने पोलिसांना सांगितले.