कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल गहिवरले
भाजपाच जेष्ठ नेते कै.बाबा देसाई यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा
राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष आणि शेतकरी नेते पाशाभाई पटेल यांनी मंगळवारी दुपारी भाजपाचे जेष्ठ नेते कै.बाबा देसाई यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले यावेळी बाबांच्या जून्या आठवणींना उजाळा देताना पाशाभाईंना गहिवरून आलं. तत्वनिष्ठ मित्राला मुकलो अशा शब्दात त्यांनी बाबांच्या आठवणी सांगताना बाबांच्या कुटुंबियांनाही अश्रू अनावर झाले. यावेळी बाबा यांचे पुत्र नितीन देसाई, प्रविण देसाई यांना धीर दिला. दरम्यान त्यांनी रयत क्रांती संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत घाडगे यांची भेट घेवून शेतकरी चळवळीतील खंडेराव घाडगे यांना ही श्रध्दांजली वाहीली. तसेच शेतकरी संघटनेचे आदम मुजावर यांच्याही कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले.
बाबा देसाई, खंडेराव घाडगे, आदम मुजावर या चळवळीतील नेत्यांचं नुकतंच निधन झालं. लातूर, मुंबई असा प्रवास करीत मंगळवारी सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाशाभाई पटेल कोल्हापुरात दाखल झाले. शेतकरी संघटनेचे जुने जाणते नेते भगवानराव काटे यांना सोबत घेवून त्यांनी कळंबा येथील स्व.बाबा देसाई यांच्या घरी भेट दिली. देसाई यांच्या नातेवाईकांची आपुलकीने विचारपूस करीत बाबांच्या आठवणींना उजाळा दिला. आणि एक-एक आठवणी सांगत पाशाभाई भाउक झाले. त्यांना अश्रु अनावर झाले. तत्वनिष्ठा हे काय असते हे मी बाबांच्याकडून शिकलो. ते आज आपल्यात नाहीत. परंतू त्यांचा विचार खाली पडू देऊ नका. असा वडीलकीचा सल्ला त्यांनी देसाई कुटुंबियांना दिला. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहीली. त्यानंतर त्यांनी खंडेराव घाडगे (सरकार), शेतकरी संघटनेचे आदम मुजावर यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष भगवान काटे, डॉ.संदेश केसरे, बाजीराव पोवार, प्रकाश यादव, प्रशांत पाटील, अशोक पाटील, अशिष पोवार, प्रणिल पाटील उपस्थित होते.
