जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी विजय कर्वे यांची निवड झाल्याबद्दल उदगाव कल्लेश्वर मंदिर मध्ये ग्रामस्थांच्याकडून म्हणजेच राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षांच्या शिलेदारांच्याकडून स्वागत समारंभ पार पडला.
या स्वागत समारंभामध्ये राजू शेट्टी यांनी उदगावच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना उद्देशून हे स्वाभिमानी संघटनेचे रोपटे उदगावातून लावलेले होते आणि याचा वटवृक्ष झाल्यानंतर अनेक लोक त्याच्या सावलीला फळे खाण्यासाठी आसरा घेण्यासाठी म्हणून त्यांनी या वृक्षाचा उपभोग घेतला. पण, खरोखरच उदगावच्या लोकांनी ह्या वटवृक्षाला रोपटे असताना मशागत घेऊन खत पाणी घालून याचा वटवृक्ष केल्याची कबुलीच दिली आणि इथून पुढे सुद्धा मला उदगावातूनच क्रांती झालेली पाहायचे आहे, अशी भावनिक कार्यकर्त्यांना घातली आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वच कार्यकर्ते हजर होते. राजू शेट्टीनी सुद्धा सर्वांना भावनिक साद घातली आणि विजय कर्वे यांच्या माध्यमातून उदगावातच नव्हे तर शिरोळ तालुक्यातच नव्हे राज्यभरात विजय कर्वे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटना परत एकदा उभारी घेईल असे राजू शेट्टीनी आवर्जून सांगितले.
सत्कारमूर्ती विजय कर्वे यांनी सर्वांच्या आभार मानत असताना माझ्यामागे आता जसं तुम्ही असंख्य संख्येने उपस्थित राहून माझा सत्कार केला. त्याचप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजू शेट्टी यांनी माझ्या खांद्यावर दिलेल्या या जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत सदैव रहावे आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे आलाय म्हणल्यानंतर राहचाल अशी मला खात्री आहे.
यावेळी विजयी कर्वे यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते हजर होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी कोळी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच रमेश पठारे यांनी केले. स्वागत बाळासाहेब कोळी यांनी केले आणि आभार प्रकाश बंडगर यांनी मानले. विवेक पाटील, जवाहर चौगुले, हनुमानचे चेअरमन राजू चौगुले, रमेश कदम, बाळू वरेकर, मनु पुजारी, बाजीराव कांबळे, श्रीकांत कोरे, रमेश पाटील, राहुल चौगुले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
