कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा
जिल्ह्यातील माजी मंत्री व विद्यमान विधान परिषदेचे आमदार यांनी काल विधिमंडळामध्ये हेलिकॉप्टर व खनि संदर्भात जे वक्तव्य केले ते दिशाभूल करणारे आहे. या आरोपात तत्य नाही, अशी माहिती टोपी येथील शिवाजी आनंदराव पोवार यांनी पत्रकार बैठकीत दिली.
आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता पवार म्हणाले, मी स्वतः बऱ्याच वेळा त्यांच्याकडे कामानिमित्त जात असतो व त्यांनी यापूर्वी मला सहकार्य केलेले आहे. परंतु हेलिकॉप्टर व खनि संदर्भात त्यांनी विधिमंडळात जे वक्तव्य केले आहे. ते पूर्ण चुकीचे आहे. हेलिकॉप्टर खरेदीसाठी आपण दोन ते तीन बँकांकडून कर्ज घेतले आहे. त्याची मी चौकशी अंती स्पष्टीकरण देऊ शकतो. सध्या माझे रत्नागिरी-नागपूर व मुंबई-गोवा रोडचे काम सुरू आहे. त्यामुळे खनि मधील पैशातून हेलिकॉप्टर घेतलेली नाही, या आरोपात कोणतेही तथ्य नाही, असेही त्यांनी सांगितले.
सध्या टोप, शिये, कासारवाडी गावात बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. त्या ठिकाणी लीज कॅन्सल होऊन सातबारा रद्द केलेला आहे. तरी देखील त्या गटात रोज कमीत कमी 100 ते 125 डंपर बेकायदेशीर वाहतूक होत आहे. त्याची माहिती घेऊन आमदार महोदयांनी चौकशी करावी. अशी मागणी त्यांनी पत्रकार बैठकीत केली.
मी हेलिकॉप्टर घेतले आहे. पण ते खनिजा जोरावर घेतलेले नाही. कारण ती खण कोल्हापूर महापालिकेच्या ताब्यात आहे. त्या खणीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे. मी वारंवार महापालिका प्रशासनाला याबाबत कळविले सुद्धा आहे. तरी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ती खण 2014 मध्ये बंद पाडण्यात आली आहे.
