Spread the love

बुलडाणा / महान कार्य वृत्तसेवा

आषाढीनिमित्ताने विठुरायाचं दर्शन डोळेभरुन झालं. आता घरचे वेळ लागले. पांडुरंगाच्या भेटीनंतर घरी निघालेल्या भाविकांवर काळानं घाला घातला आणि अनब घात झाला. आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूरहून परत खामगावला निघालेल्या भाविकांच्या एसटी बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीजवळ झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

51 प्रवाशांनी भरलेल्या बसचा अपघात

चिखली इथे महाबीज कार्यालयासमोर एसटी बस दुभाजकावर जोरात आदळून पलटी झाली. प्रवाशांनी भरलेली बस होती. थोडक्यात अनर्थ टळला. या अपघातात जवळपास 30 प्रवासी भाविक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चिखली आणि बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातावेळी बसमध्ये एकूण 51 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी टळली असून, ही एक दिलासादायक बाब आहे.

अपघाताचं कारण काय?

हा अपघात नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. मात्र, अपघातात जखमी झालेल्या काही भाविकांनी चालकाला डुलकी लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र पुन्हा एकदा धीम्या गतीनं वाहतूक सुरू झाली आहे.

नेरुळमध्ये स्टंट बेतला जीवावर नेरूळ रेल्वे स्थानकाजवळ स्टंट करताना 16 वर्षीय आरव श्रीवास्तव हा तरुण गंभीररीत्या जखमी झाला आहे. ओव्हरहेड वायरला स्पर्श झाल्यामुळे त्याला तीव्र विद्युत धक्का बसला आणि तो थेट खाली कोसळला. ही घटना राजीव गांधी ब्रिजखाली उभ्या असलेल्या कचरा वेचक रेल्वे गाडीजवळ घडली. बेलापूरला राहणारा आरव आणि त्याचे तीन मित्र रेल्वे गाडीवर उभे राहून स्टंट करत ीाातब शूट करत होते. त्यावेळी आरवचा हात अचानक ओव्हरहेड वायरला लागला.