मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथ यांनी 303 धावांची भागेदारी केली आणि टीम इंडियाला पुन्हा बॅकफफूटवर पाठवलं. इथंच शुभमन गिलने मोठी चूक केली. शुभमनने यावेळी चौथ्या बॉलरवर लक्षच दिलं नाही. सुरुवातीच्या 21.4 ओव्हरमध्ये 84 धावांवर 5 विकेट्स पडल्या. याचा अर्थ, टीमने खूप लवकर विकेट्स गमावल्या आणि त्यांची सुरुवात खराब झाली. त्यानंतर 61.1 ओव्हरमध्ये 303 धावांवर एकही विकेट पडली नाही.
टीम इंडियाचा चौथा बॉलर कुठंय?
टीम इंडिया आकाश दीप, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा या तीन पेस बॉलिंग लाईनअपने मैदानात उतरली होती. या तिन्ही बॉलरची धार कमी होत असताना शुभमनने चौथा बॉलर गेममध्ये उतरवायला हवा होता. हा बॉलर म्हणजे ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डी… नितीश कुमारला शुभमनने खूप उशिरा बॉलिंग दिली. तसेच त्याला फक्त 6 ओव्हर टाकायला मिळाल्या. शार्दुल ठाकूरच्या जागेवर खेळणाऱ्या नितीश कुमारला आपल्या बॉलिंगची किमया दाखवता आली नाही.
तसेच हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथ यांची 303 धावांची भागेदारी टीम इंडियासाठी घातक ठरत असताना एकाही बॉलरला 145 च्या स्पीडने बॉलिंग करता आली नाही. याचा फटका भारतीय संघाला बसला. बेन स्टोक्सच्या विकेटनंतर भारत भारावून गेला. त्यांनी बाउन्सर युक्तीने ओव्हरॲक करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्यांना कसोटी सामन्याच्या लांबीपासून दूर नेलं. इतके बाउन्सर टाकण्यात काही अर्थ नाही, कारण त्यांच्याकडे 145 किमी/ताशी वेगाने गोलंदाजी करू शकणारा गोलंदाज नसताना स्मिथ आणि ब्रूक यांनी मोठ्या प्रमाणात क्रूर पुल शॉट्स मारले, असं टीम इंडियाचा माजी गोलंदाज वरुण अरॉन म्हणाला आहे.
”आकाश दीप हा त्याचा तिसरा किंवा चौथा कसोटी सामना खेळत आहे, प्रसिद्ध कृष्णासोबतही असेच आहे. मी 38 कसोटी सामने खेळले आहेत. माझे एकमेव ध्येय म्हणजे सतत लाईन अँड लेन्थमध्ये गोलंदाजी करणं आणि कामगिरी करणं. जर दबाव वाढला असता तर ते आमच्यासाठी खूप चांगले झाले असते”, असं मोहम्मद सिराज म्हणाला.
