मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशील केडियाचं ऑफिस फोडण्यात आलं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी दगडफफेक करत सुशील केडियाच्या वरळीतील ऑफिसची तोडफफोड करण्यात आली आहे. सुरक्षारक्षकांनी मनसे कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांच्या गळ्यात पक्षाचं उपरणं होतं. तोडफफोड केल्यानंतर कार्यालयाबाहेर तणावाचं वातावरण आहे. महत्त्वाचं म्हणजे वरळीतच राज आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा पार पडत असून येथे कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांनी तुफान गर्दी केली आहे.
सुशील केडिया काय म्हणाले होते?
सुशील केडिया यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, ”राज ठाकरे याची नोंद घ्या की, मागील 30 वर्षांपासून मुंबईत राहत असूनही मला मराठी नीट येत नाही. आता तुमच्या अती गैरवर्तनामुळे मी निश्चित केलं आहे की, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत आहे तोपर्यंत मराठी शिकणार नाही अशी मी प्रतिज्ञा करतो. काय करायचं आहे बोल?”.
संजय राऊतांनी केली होती टीका
जय राऊत म्हणाले होते की, ”त्यांची टोकाची भूमिका माझ्या कानावर आली आहे. त्यांनी राज ठाकरेंना जे आव्हान देण्याचा प्रयत्न केला ते मी पाहिलं आहे. महाराष्ट्रात राहून मी मराठी शिकणार नाही ही जी मस्ती वाढली आहे ती एकनाथ शिंदे, अमित शाह यांच्या राजकारणामुळे वाढली आहे. आज जो जय गुजरातचा नारा दिला त्यामुळे केडियासारख्या लोकांना बळ मिळतं. मराठीविरोधात अशी भूमिका घेती यावी यासाठीच तर अमित शाह यांनी शिवसेना फोडली”.
आग्रह करु शकतो दुराग्रह नाही – देवेंद्र फडणवीस
”महाराष्ट्रात राहून मराठी शिकण्याचा आग्रह करु शकतो दुराग्रह नाही. मी उद्या तामिळनाडूत गेल्यानंतर कोणीही मला तामिळ शिकली पाहिजे म्हणजे दुराग्रह करु शकत नाही. मला तामिळ भाषा आवडते, पण दुराग्रह करु शकत नाही. मला जर मराठीत बोलायचं असेल तर मराठीत बोलीन. पण मला जर तिथे कोणी दुराग्रह केला तर ते योग्य असेल का? आपण एका देशात भारतात राहतो. बाजूचे राज्य, भाषा काही पाकिस्तान नाही. मराठी माणूस इतकी संकुचित मनोवृत्ती ठेवू शकत नाही,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
मराठीचा अपमान सहन करु शकत नाही – योगेश कदम
”महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमानदेखील झाला नाही पाहिजे हे लक्षात ठेवायला हवं. महाराष्ट्रात राहताय, व्यवसाय करताय तर मराठीचा अपमानसहन करु शकत नाही. दोन्ही गोष्टी एकत्र चालत असता. मराठी, हिंदी विषयावर जे काही राजकारण सुरु आहे तो पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाई केली जाईल. कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल,” असं योगेश कदम म्हणाले आहेत.
