मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोन्याचे दर काहीसे घसरले आहेत. मात्र देशांतर्गंत बाजारात आज सुरुवातीला सोन्याच्या दरात काहीशी सुस्ती दिसून आली होती. मात्र त्यानंतर सोन्याचे दर पुन्हा वाढ झाली. या दरम्यान चांदीने मात्र अधिक उसळी घेतली आहे. र्श्ण्ें वर जुलैचा चांदीचा वायदा 517 रुपयांच्या तेजीसोबतच 1,06,741 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. आज सोन्याच्या दरात किती वाढ झाली जाणून घेऊयात.
आंतरराष्ट्रीय स्तरावर गरुवारी सोन्याच्या दरात किंचितशी घसरण झाली होती. कारण गुंतवणुकदारांनी अमेरिकेचे रोजगार आकडे आल्यानंतर मोठी गुंतवणूक करण्यास नकार दिला होता. हे आकडे अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या आगामी नितीबाबत महत्त्वाचे संकेत देऊ शकतात. स्पॉट गोल्ड 0.3 टक्क्यांनी घसरून 3.346.47 प्रति औंसवर पोहोचले होते. तर अमेरिकी गोल्ड फ्युचर्स 0.1 टक्के इतकी किंचितशी घसरणीसोबत त्र्3.357.20 वर व्यवहार करत आहे.
आज सोन्याच्या दरात 24 कॅरेटच्या दरात 440 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 99,330 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 91,050 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 74,500 रुपयांवर स्थिरावलं आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 91,050 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 99,330 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 74,500 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,105 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 9,933 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7, 450 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 72,840 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 79,464 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 59, 600 रुपये
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 91,050 रुपये
24 कॅरेट- 99,330 रुपये
18 कॅरेट- 74,500 रुपये
