Spread the love

नवजात बाळाला इमारतीच्या खालच्या शेडमध्ये ठेवलं, दुधाच्या बाटलीसह कपडे अन्‌ इंग्रजीत चिठ्ठी, नवी मुंबईच्या पनवेलमधला प्रकार

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

नवी मुंबईतील पनवेल परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पनवेल येथील तक्का भागात असलेल्या स्वप्नालय आश्रमाच्या बाहेर दोन दिवसांचे अर्भक आढळले आहे. हे अर्भक एका बास्केटमध्ये ठेवले गेले होते. त्याचबरोबर त्याच्या जवळ दूध पावडर, दूधाची बाटली आणि एक चिट्ठीही ठेवण्यात आली होती.

या चिठ्ठीत ”मी माझ्या बाळाचा सांभाळ करू शकत नाही. माझी आर्थिक परिस्थिती वाईट असल्यानं मानसिकदृष्ट्‌‍या मी सक्षम नाही. माझ्या बाळाची हेळसांड होऊ नये याची काळजी घ्या. भविष्यात मला बाळाला भेटता आलं तर नक्की भेटेन. कृपया मला माफ करा असा मजकूर लिहिल्याचं समोर आलं. ही घटना पनवेलमधील उच्चभ्रू परिसर असलेल्या वस्तीमध्ये घडल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी सांगितलं की, अर्भक रात्रीभर रडत होतं, पण सकाळीपर्यंत कुणालाही या गोष्टीची कल्पना नव्हती.

नवी मुंबईच्या पनवेल शहरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. शहरातील तक्का विभागात असलेल्या स्वप्नालय या मुलींच्या बालगृहाजवळ, फुटपाथवर दोन दिवसांचं नवजात अर्भक सापडलं. हे बालगृह महिला आणि बालविकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे मान्यताप्राप्त असून, या संस्थेच्या इमारतीच्या खालच्या भागातच एका बास्केटमध्ये अर्भक आढळून आलं. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अर्भक रात्रीच्या वेळेस कोणीतरी सोडून गेलं असावं. बास्केटमध्ये अर्भकाबरोबर सेरेलॅक, कपडे आणि एक इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठीही सापडली.  या चिठ्ठीत मी माझ्या बाळाचा सांभाळ करू शकत नाही. माझी आर्थिक परिस्थिती वाईट आहे, मानसिकदृष्ट्‌‍या मी सक्षम नाही. माझ्या बाळाची हेळसांड होऊ नये, त्याची काळजी घ्या. भविष्यात मला बाळाला भेटता आलं, तर नक्की भेटेन. कृपया मला माफ करा.”असे लिहिले आहे.

स्वप्नालय आश्रमाजवळील ही घटना लक्षात येताच, पनवेल महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अर्भक ताब्यात घेतलं आणि लगेच खाजगी रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अर्भकाची प्रकृती सध्या ठीक असल्याचं सांगितलं आहे. यानंतर अर्भक पनवेल शहर पोलीस ठाण्यात सोपवण्यात आलं असून, पोलीस अर्भकाची काळजी घेत आहेत. तसेच, अर्भक कुणी ठेवलं याचा शोध घेण्यासाठी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत. या घटनेने स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, संबंधित आई-वडिलांची ओळख पटवण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.