Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज रिंकू सिंग आता क्रिकेटमधील कामगिरीसोबतच सरकारी सेवेतही नवी इनिंग सुरू करणार आहे. समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोजसोबत साखरपुडा झाल्यानंतर आता रिंकू सिंगला योगी सरकारकडून मोठं गिफ्ट मिळणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने त्याच्या सरकारी नियुक्तीसाठी तयारी सुरू केली असून, लवकरच तो एका अधिकारपदावर कार्यभार स्वीकारणार आहे. चला जाणून घेऊयात त्याला कोणत्या विभागात जॉइनिंग मिळणार? कोणत्या पदावर तो काम करणार

कोणत्या विभागात काम करणार?

रिंकू सिंगला उत्तर प्रदेशच्या शिक्षण विभागात ‘जिल्हा बेसिक शिक्षाधिकारी ‘ पदावर नियुक्त करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती मिळत आहे. ‘आंतरराष्ट्रीय पदक विजेते थेट भरती नियमावली 2022’ अंतर्गत त्याची ही नेमणूक होणार आहे. बेसिक शिक्षण संचालनालयाकडून रिंकूला आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.

पूर्ण करावी लागणार शैक्षणिक पात्रता

या नेमणुकीनंतर रिंकूला 7 वर्षांच्या आत आवश्यक शैक्षणिक अर्हता पूर्ण करावी लागणार आहे. तोपर्यंत त्याला पदोन्नती मिळणार नाही. क्रीडा विभागाकडून या नेमणुकीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

‘असा’ आहे रिंकूचा प्रवास

अलिगढमधील एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेला रिंकू सिंग आज देशातील चर्चेतला खेळाडू आहे. त्याचे वडील गॅस सिलिंडर वितरक होते आणि रिंकूने सुरुवातीच्या काळात त्यांच्यासोबत कामही केलं होतं. 2023 मध्ये आयर्लंडविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या रिंकूने, घ्झ्थब 2024 मध्ये ख्ख्ठ साठी जबरदस्त खेळ केला. अलीकडेच त्याचा साखरपुडा सपा खासदार प्रिया सरोजसोबत पार पडला आहे.

इतर खेळाडूंनाही मिळणार सरकारी नोकरी

फक्त रिंकू सिंगच नाही, तर इतर काही खेळाडूंनाही उत्तर प्रदेश सरकारकडून विविध विभागांत नियुक्तीची शिफारस करण्यात आली आहे:

प्रवीण कुमार (पैरा ॲथलीट) – गृहनिर्माण विभागात डीएसपी

राजकुमार पाल (हॉकी खेळाडू) – गृहनिर्माण विभागात डीएसपी

अजीत सिंह (पैरा ॲथलीट) – पंचायती राज विभागात जिल्हा अधिकारी

सिमरन (पैरा ॲथलीट) – पंचायती राज विभागात जिल्हा अधिकारी

प्रीती पाल (पैरा ॲथलीट) – ग्रामीण विकास विभागात ँऊध्

किरण बालियान (ॲथलीट) – वन विभागात क्षेत्रीय वन अधिकारी

हे सर्व निर्णय खेळाडूंच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना सार्वजनिक सेवेतही सहभाग घेण्याची संधी देण्यासाठी घेण्यात आले आहेत.