इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675 व्या समाधी महोत्सवानिमित्त इचलकरंजी व परिसरातील आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे हे 35 वे वर्ष असून रविवार 6 जुलै पासून या स्पर्धांना प्रारंभ होणार आहे.
श्री नामदेव महाराजांच्या समाधी महोत्सवनिमित्त प्रतिवर्षी श्री नामदेव समाज सेवा मंडळ व श्री संत नामदेव युवक संघटना यांच्यावतीने आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. १ ली ते १० तील विविध गटात चित्रकला, सामान्यज्ञान, निबंध, बुध्दिबळ, वक्तृत्व, पाठांतर, गायन, वेशभूषा स्पर्धा होणार आहेत. सदर स्पर्धा मध्ये सहभागी होण्यासाठी नामदेव भवन, दाते मळा या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
