मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
लोकप्रिय पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिलजीत दोसांझवर टोरॅन्टो मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी (च्या कोर्सचा भाग झाला. नुकत्याच एका कॅनडा युनिव्हर्सिटीनं यावर पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं की दिसलीजचा कोर्स हा टॉरेन्टो मेट्रोपॉलिटन विश्वविद्यारयाच्या क्रिएटिव्ह स्कूलमध्ये शिकवला जात आहे. या गोष्टीची घोषणा ही टॉरेंटोमध्ये असलेल्या र्ऱ्ेंऱ्ए च्या बिलबोर्ड शिखर संमेलनात करण्यात आली आहे.
बिलबोर्डच्या रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे दिलजीतच्या कोर्समध्ये त्याचं कल्चरल, म्यूजिकल आणि त्याच्या कामासंबंधीत गोष्टींची माहिती देण्यात येईल. तर हा कोर्स 2026 च्या शेवटी सुरुवात करण्यात येईल आणि त्याच्यासोबत सगळी माहिती ही वेबसाइटवर उपलब्ध होईल. दिलजीत दोसांझनं देखील रविवारी 22 जून रोजी त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ही गोष्ट शेअर केली होती.
या कोर्सची घोषणा अभिनेत्याचा आगामी चित्रपट ‘सरदार जी 3’ च्या विवादात येण्याच्या काही तासां पूर्वी करण्यात आला. खरंतर, दिलजीत दोसांझच्या या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरच्या कास्टिंगवरून हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या पंजाबी चित्रपटाचा तो निर्माता आहे. हा चित्रपट भारत सोडून जगभरात 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. टॉरेंटो मेट्रोपॉलिटन यूनिव्हर्सिटीच्या क्रिएटिव्ह स्कूलमध्ये असिस्टंट प्रोफेसर डॉ चार्ली वॉल-एन्ड्रूज यांनी या कोर्स विषयी सांगितलं. ‘टॉरेंटो मेट्रोपॉलिटन यूनिव्हर्सिटी दिलजीत दोसांझवर एक कोर्स सुरु करण्यासाठी उत्सुक आहेत. त्याची संस्कृती, त्याची गोष्ट, ओळख आणि ग्लोबल म्यूजिक इंडस्ट्रीमधील संबंध दाखवते. त्याच्या इंडस्ट्रीमध्ये येण्यावरून एक गोष्ट कळते ती म्हणजे पंबाजी म्यूजिक कशी जगभरात प्रभाव टाकले आणि आर्थित रित्या देखील यशस्वी ठरत आहे. या कोर्समध्ये विद्यार्थी हे शिकतील की सांस्कृती किंवा एका विशिष्ठ ठिकाणी असलेल्या संगीताला जागतिकस्तरावर कसं घेऊन जायचं आणि त्याचा कसा प्रभाव होतो. त्याशिवाय या म्युजिकनं तुम्ही सगळ्यांना कसे जोडून घेतात,’ असं असिस्टंट प्रोफेसर डॉ चार्ली वॉल-एन्ड्रूज यांनी सांगितलं.
