Spread the love

हिंदी सक्तीवरुन का बोलत नाही; संजय राऊतांचा सवाल

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

राज्यातील शाळांमध्ये केल्या जाणआऱ्या हिंदी सक्तीवरुन शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी बोचरी टीका केली. यावेळी त्यांनी थेट मोदींना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. हिंदी भाषीक पट्ट्‌‍यात हिंदी शाळा बंद पडतायत, मोदींनी आधी तिथे काम करणं आवश्यक आहे, मुंबई आणि महाराष्ट्रत हिंदी संपंन्न आहे, आम्हाला हिंदी कधी शिकवायला लागली नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच, मुख्यमंत्र्यांनी मराठीसाठी किती बैठका घेतल्या सांगावं, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. एवढंच नाहीतर यावेळी संजय राऊतांनी मराठी कलाकार आणि मराठी क्रिकेटपटूंनाही फैलावर घेतलं आहे.

मराठीवरती हल्लो होत असताना अभिनेते नाना पाटेकर, प्रशांत दामले, मराठी क्रिकेटपटू कुठे आहेत, असा थेट सवाल संजय राऊतांनी विचारलं. तसेच, मुख्यमंत्र्यांनी मराठीसाठी किती बैठका घेतल्या? ते सांगावं असं आवाहनसुद्धा संजय राऊतांनी केलं आहे. तसेच, कोण साहित्यिक मला दहा नावं सांगा, देवेंद्र फडणवीस यांना दहा साहित्यिक यांची नावे माहिती आहे का? एकनाथ शिंदेंना पाच साहित्यिक तरी माहिती आहेत का? असा थेट सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, ”साहित्यिकांशी चर्चा करण्याची गरज नाही, किती साहित्यिक आले छाती पुढे काढून? कोण साहित्यिक मला दहा नाव सांगा, देवेंद्र फडणवीस यांना दहा साहित्यिक यांची नावं माहिती आहे का? एकनाथ शिंदेंना पाच साहित्यिक तरी माहिती आहेत का? साहित्यिकांना जर मराठी भाषा संदर्भात एवढी चिंता असते, तर जो दबाव चालला आहे, हिंदी भाषा लादली जात आहे, त्याच्यावरती साहित्यिक उठले असते…”

नाना पाटेकर प्रशांत दामले कुठे आहेत? : संजय राऊत

”कुठे आहेत नाना पाटेकर कुठे आहेत? प्रशांत दामले कुठे आहेत? माधुरी दीक्षित कुठे आहेत? मराठी क्रिकेटपटू, मराठी माणसानं तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या, तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचं, पण मराठी वरती असे हल्ले होत असताना, तुम्ही गप्पच काय साहित्यिकांचा आम्हाला सांगू नका, फडणवीस आम्हाला माहिती आहे, 90ज्ञब लोक हे जे लाभार्थी आणि पुरस्कार करते आहे, हे लाचार आहेत…”, असं संजय राऊत म्हणाले.

 ”या सगळ्यांची मुलं परदेशात शिकत आहेत, परदेशात शिकून आली आहेत, यांना ना मराठी भाषेचा गंध आहे, ना हिंदीचा गंध आहे… सगळे भारतीय जनता पक्षामध्ये असलेले प्रमुख नेते दिल्ली पासून मुंबई महाराष्ट्रापर्यंत सगळे विदेशी शाळांमध्ये शिकत आहेत. इंटरनॅशनल स्कूलला त्यांची नातवंड शिकत आहेत.”, असंही संजय राऊत म्हणाले.

आमची मुलं मराठी शाळेत शिकली : संजय राऊत

”मी अभिमानानं सांगू शकतो, माझ्या मुली मराठी शाळेत शिकल्या, मला अधिकार आहे बोलण्याचा, आमची मुलं मराठी शाळेत शिकली आहेत आणि हट्टानं आम्ही त्यांना मराठी शाळेत टाकलं आहे… तुमची आहेत का? तिथे मंत्र्यांची मुलं आणि भाजपवाल्यांची मुलं यांनी काढा साहित्यिकांची मुलं इंग्लिश शिकत आहेत, तुम्ही काय त्यांच्याबरोबर बैठका घेत आहेत? त्यांचं नातवंड इंग्लिश शाळेत आहे किंवा इंटरनॅशनल प्रदेशात आहेत, बैठका घ्यायची गरज नाही, बैठकांचा धुरळा चालला आहे, हाच मराठीचा अपमान आहे, तुम्ही मराठी भाषा संदर्भात कोणाशी बैठका घेत आहात?…?”, असं संजय राऊत म्हणाले.