Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

दक्षिण आफ्रिकेने वर्ल्‌‍ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करत 27 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयसीसी ट्रॉफी पटकावली आहे. तेंबा बावुमा आणि एडन मारक्रम यांच्या उत्कृष्ट भागीदारीच्या जोरावर आफ्रिकेने विजयी लक्ष्य गाठले. विजयानंतर कर्णधार तेंबा बावूमाने खुलासा केला की सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चोकर्स म्हणत त्यांना स्लेज केलं होतं.

2025 ची वर्ल्‌‍ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावूमाने ऑस्ट्रेलियन खेळाडूंबद्दल मोठा खुलासा केला. तो म्हणाला की जेव्हा तो आणि एडन मारक्रम फलंदाजी करत होते तेव्हा त्यांना चोकरच्या टॅगची आठवण करून दिली. ही घटना अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवशी घडल्याचे सांगितले. बावूमाने पत्रकार परिषदेत याबद्दल सांगितले.

दक्षिण आफ्रिकेने शेवटची आयसीसी नॉकआउट ट्रॉफी 1998 मध्ये जिंकली होती. त्यानंतर, 12 क्वार्टरफायनल, 2 सेमीफायनल आणि आयसीसी स्पर्धेच्या एका फायनलमध्ये त्यांचा पराभव झाला. यामुळे, दक्षिण आफ्रिकेला चोकर्स हा टॅग देण्यात आला. पण लॉर्ड्‌‍सच्या ऐतिहासिक मैदानावर त्यांनी हा टॅग पुसून टाकला. पण ऑस्ट्रेलियन खेळाडू सामन्याच्या चौथ्या दिवशी बावूमा आणि मारक्रमला याची आठवण करून देण्यास विसरले नाहीत. त्यावेळेस दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी 60 पेक्षा जास्त धावांची आवश्यकता होती.

अनेक मोठे सामने जिंकण्यात अपयशी ठरल्यामुळे चाहत्यांनी दक्षिण आफ्रिकेला ‘चोकर्स’ या नावाने बराच काळ ट्रोल केले. अनेकांना असं वाटत होतं की ऑस्ट्रेलियाच्या हातात अजूनही एक दिवस आहे आणि त्यात ते कमबॅक करू शकतात. विजयानंतर बोलताना बावूमा म्हणाला की, ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूने म्हटलं की, चौथ्या दिवशी विजयासाठी 69 धावांची आवश्यकता असूनही 8 विकेट्‌‍स शिल्लक असतानाही ते बाद होऊ शकतात.

”आम्ही फलंदाजी करत असताना, आम्हाला ऑस्ट्रेलियन खेळाडू ”चोक” हा भयानक शब्द वापरताना ऐकू येत होतं. आम्हाला चोकर असल्याचं सकाळीही हिणवलं. त्यांच्या एका खेळाडूने आम्हाला अजूनही सर्वबाद होऊ शकतं असं म्हटलंष्ठ मी ते नक्कीच ऐकलं होतं.”, असं पत्रकार परिषदेत बावूमा म्हणाला.

बावूमा पुढे म्हणाला, ”आम्हाला अंतिम फेरी जिंकून अनेक वर्षे झाली आहेत, आमचं नाव इतिहासात मागे गेलं आहे, पण आता आम्ही अशा गोष्टीचा भाग आहोत जे यापूर्वी कधीही झालेलं नाही.” अंतिम सामन्याचा सामनावीर ठरलेल्या एडन मारक्रमने देखील चोकर्स शब्दाबद्दल वक्तव्य केलं. तो म्हणाला, ”पुन्हा कधीही तो शब्द ऐकावा लागू नये, हे नक्की. चांगली कामगिरी करत हा सामना जिंकून तो टॅग पुसून काढणं ही या संघासाठी खूप मोठी गोष्ट आहे.” या विजयासह, दक्षिण आफ्रिका हा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियानंतर ेंऊण् विजेतेपद जिंकणारा तिसरा संघ बनला.