Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

आज फादर्स डे आहे. याच निमित्ताने सर्वजण आपल्या वडिलांविषयीचे प्रेम, भावना व्यक्त करत आहेत. वडिलांनी केलेल्या कष्टाविषयी, त्यांच्यासोबत असलेल्या बॉन्डिंगविषयी आज सर्वजण मुलं आपल्या भावना शेअर करत असतात. अशातच आता अशीच बाप-लेकीची जोडी चर्चेत आहे. ही जोडी आहे भगवद्गीतेचे प्रवचनकार आणि ‘घेतला वसा टाकू नको’ फेम अतुलशास्त्री भगरे गुरुजी आणि त्यांची मुलगी अभिनेत्री अनघा भगरे.

भगरे गुरुजी आणि त्यांची मुलगी अनघाने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी अनेक किस्से सांगितले आणि दोघांचे नाते कसे आहे? याविषयी सांगितले. सोबतच भगरे गुरुजींनी त्यांना कसा जावई पाहिजे? याविषयीदेखील सांगितले.

‘तुमच्यासारखा साचा देवाने बनवणं केव्हाच सोडून दिलं’ राज ठाकरेंसाठी तेजस्विनी पंडितची ‘दिल से’ पोस्ट

गुरुजी म्हणतात, ”तिला मी पूर्ण स्वातंर्त्य दिले आहे. माझे तिच्यावर नितांत प्रेम आहे आणि तिच्यावर विश्वास आहे की ती विचारपूर्वक योग्य निर्णय घेईल.” भावाच्या भव्य विवाहसोहळ्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडणाऱ्या अनघाबद्दल बोलताना ते म्हणतात, ”आता तिच्या आईला आणि मलाही तिच्या लग्नाचे वेध लागले आहेत.”

भगरे गुरुजींना ‘जावई कसा हवाय?’

भगरे गुरुजींना ‘जावई कसा हवाय?’ या प्रश्नावर मिश्कील उत्तर देत म्हणाले, ”कसा हवाय यापेक्षा, ‘आता फक्त हवाच आहे!’ हेच महत्त्वाचे आहे”. अनघाला विचारल्यावर ती सांगते की, ”माझे स्वप्न आहे की अरेंज कम लव्ह मॅरेज व्हावे. विचार जुळले पाहिजेत… आवडल्यास ओळख, ओळखीतून प्रेम आणि मग लग्न!”

दरम्यान, ‘रंग माझा वेगळा’ मालिकेनंतर अनघाने अभिनयात छोटा बेक घेतला आणि पुण्याच्या डेक्कनमध्ये ‘वदनी कवळ’ हे शुद्ध शाकाहारी हॉटेल सुरू केले. हे हॉटेल ती तिच्या भावासोबत चालवत आहे. इथली खासियत म्हणजे पारंपरिक चव, घरगुती वरण-भात, आमटी, उसळ आणि त्यातला प्रेमाचा मसाला.