इराण आणि इस्त्रायलमद्ये गेल्या 48 तासांपासून घनघोर संघर्ष सुरुच; तेल प्रकल्पांवर हल्ल्यानंतर इराणने इसायलवर प्रगत मिसाईल डागली, अनेक जीवितहानी
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
शनिवारी रात्री उशिरा इराण आणि इसायलने पुन्हा एकदा एकमेकांवर अनेक क्षेपणास्त्र डागले. दोन्ही देशांमधील संघर्ष गेल्या 48 तासांपासून सुरू आहे. इसायलने तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. याशिवाय तेहरान आणि बुशहरमधील तेल डेपो आणि गॅस रिफायनरीसह 150 हून अधिक लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला आहे. दोन दिवस चाललेल्या युद्धात आतापर्यंत 138 इराणी मारले गेले आहेत, ज्यात 9 अणुशास्त्रज्ञ आणि 20 हून अधिक इराणी कमांडर आहेत. याशिवाय 350 हून अधिक जखमी झाले आहेत.
इराणची राजधानी तेहरानसह 7 राज्यांमध्ये हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आली आहे. इराणनेही इसायलवर 150 हून अधिक क्षेपणास्त्र डागून प्रत्युत्तर दिले आहे. हल्ल्यात 11 इसायली मारले गेले आहेत आणि 300 हून अधिक जखमी झाले आहेत. इराणने 3 इसायली एफ-35 विमाने पाडल्याचा दावाही केला आहे.
इसायल आणि इराणमध्ये 48 तासांचा संघर्ष, 10 पाँईंट्समध्ये महत्त्वाचे मुद्दे
1. इसायलने ऑपरेशन रायझिंग लायन सुरू केले. 200 लढाऊ विमानांनी इराणवर हल्ला.
2. इसायली कारवाईत 9 इराणी शास्त्रज्ञ आणि 20 हून अधिक लष्करी कमांडर मारले गेले.
3. इराणने प्रत्युत्तर दिले, त्याला ‘ट्रू प्रॉमिस थी’ असे नाव दिले. 150 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली.
4. इराणने इसायली संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने मारा केल्याचा दावा केला.
5. नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदींशी बोलून परिस्थितीची माहिती दिली.
6. ट्रम्प यांनी धमकी दिली, म्हणाले, इराणने अणु करारावर स्वाक्षरी करावी अन्यथा मोठा हल्ला होईल.
7. इसायली राष्ट्रपतींना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
8. इराणने तीन इसायली एफ-35 विमाने पाडल्याचा दावा केला.
9. इसायलमध्ये 11 जणांचा मृत्यू. 7 सैनिकांसह 300 हून अधिक लोक जखमी.
10. शनिवारी इराण आणि अमेरिका यांच्यातील अणु चर्चा रद्द करण्यात आली.
इराणने इसायलवर प्रगत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली
दरम्यान, इराणने इसायलवर हल्ला करण्यासाठी एका नवीन आणि प्रगत बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर केला आहे. शनिवार-रविवार रात्री पहिल्यांदाच ते डागण्यात आले. फार्स न्यूजनुसार, या क्षेपणास्त्राचे नाव ”हज कासिम” आहे, जे माजी कुद्स फोर्स कमांडर कासिम सुलेमानी यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. इराकमध्ये झालेल्या अमेरिकेच्या हल्ल्यात सुलेमानी मारले गेले होते. हज कासिम हे 1200 किलोमीटरच्या पल्ल्याचे घन इंधन मार्गदर्शित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्यात एक वॉरहेड आहे, जे इसायलमध्ये तैनात असलेल्या पॅट्रियट आणि अमेरिकन ढकअअऊ सारख्या संरक्षण प्रणालींमध्ये प्रवेश करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ते हायपरसोनिक वेगाने म्हणजेच सुमारे 14800 किलोमीटर प्रति तास वेगाने हल्ला करते.
इसायलने कतारच्या राज्य माध्यम अल-जझीरावर बंदी घातली
इसायलने कतारच्या राज्य माध्यम चॅनेल अल-जझीरा न्यूजवर बंदी घातली आहे. अल-जझीरानुसार, ते आता जॉर्डनमधून वृत्तांकन करत आहे. अल जझीरा कतारमध्ये मुख्यालय असलेले आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था आहे.
इसायलमध्ये मृत आणि जखमींची संख्या वाढली
रविवारी सकाळी इराणने केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या इसायली नागरिकांची संख्या 8 झाली आहे. यामध्ये दोन मुले आणि 6 महिलांचा समावेश आहे. तर 200 लोक जखमी झाले आहेत. इराणी हल्ल्यात आतापर्यंत 11 इसायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, जखमींची संख्या 300 च्या पुढे गेली आहे.
