मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
स्पाईस जेट या विमान कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. कंपनीला मार्च 2025 तिमाहीत 324.87 कोटींचा करोत्तर नफा तिपटीने वाढत 324.87 कोटींवर पोहोचला असल्याचे कंपनीने आपल्या फायलिंग मध्ये म्हटले आहे. कंपनीला 2024 मधील चौथ्या तिमाहीत 119 कोटींचा करोत्तर नफा झाला होता जो वाढून 324.87 कोटीवर पोहोचला आहे. लिमिटेडने आर्थिक वर्ष 2025 च्या चौथ्या तिमाहीत 319 कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही नफा नोंदवला आहे, जो तिसऱ्या तिमाहीतील 26 कोटी रुपयांपेक्षा 12 पटीने वाढला आहे.मात्र कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 16 टक्क्याने घसरण झाली आहे. कंपनीच्या 2024 चौथ्या तिमाहीतील 1719.3 कोटींच्या तुलनेत घटून 1446.37 कोटींवर पोहोचला आहे. कंपनीच्या मागील वर्षातील एकूण 300 कोटींच्या नुकसानीचा तुलनेत आर्थिक वर्ष 2025 मधील तिमाहीत 26 कोटीवर नफा पोहोचला होता. विमान प्रवासातील मागणीत वाढ झाल्याने कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत झाली होती.
कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये आर्थिक वर्ष 2023-24 मधील 7050 कोटींच्या तुलनेत घट होऊन 5284 कोटी वाढ झाली होती. स्पाईसजेट मध्ये आर्थिक वर्ष 2025-26 मधील तिमाहीत प्रवर्तकांनी ने 500 कोटींची गुंतवणूक केली होती.आर्थिक वर्ष 2024- 2025 साठी, एअरलाइनने 924 कोटी रुपयांचा करपूर्व नफा आणि 6,736 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला. आर्थिक वर्ष 2024 मध्ये महसूल 8,497 कोटी रुपयांवरून घसरला असला तरी, सुधारित नफा आणि ऑपरेशनल कार्यक्षमता यामुळे हा परिणाम कमी होण्यास मदत झाली.
तिमाही निकालाबाबत बोलताना समुहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह म्हणाले, ‘जटिल जागतिक पुरवठा साखळी आणि इंजिन दुरुस्तीच्या आव्हानांमुळे आमच्या बंद विमानांच्या ताफ्याचे पुनरुज्जीवन अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला असला तरी, आता त्याचा वेग स्पष्टपणे वाढत आहे. स्टँडर्डएरो आणि कार्लाइल एव्हिएशन सारख्या जागतिक दर्जाच्या ध्एश् आणि श्ध्ीं सोबतच्या आमच्या भागीदारी समुहाला फळ देत आहेत तसेच इंजिन दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुरुस्ती केलेले इंजिन आता परत येत असल्याने, आम्हाला पुढील आठवड्यात ऑपरेशनल क्षमतेत स्थिर वाढ अपेक्षित आहे.’
एअरलाइनने 24 नवीन देशांतर्गत उड्डाणांसह आपले नेटवर्क वाढवले आहे.
