मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
आयपीएल 2025 हंगामातील दुसरा क्वालिफायर सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिएमवर खेळण्यात आला. या थरारक सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर दमदार विजय मिळवला. या सामन्यात पंजाबच्या विजयामध्ये कर्णधार श्रेयस अय्यरचा वाटा मोठ राहिला. त्याने मैदानात भक्कमपणे पाय रोवून नाबाद 87 धावा ठोकत पंजाब किंग्जला पाच विकेटने विजय मिळवून दिला. त्याच्या कामगिरीच्या जोरावरच पंजाब किंग्ज संघ दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरची खेळी इतकी प्रेक्षणीय होती की त्याच्यापुढे जसप्रित बुमराहची जादू देखील फिकी पडली. जगभरातील फलंदाजांच्या मनात त्याच्या भेदक गोलंदाजीने भीती बसवणारा बुमराह देखील श्रेयसच्या फटकेबाजीला रोखू शकला नाही.
विशेष बाब म्हणजे, मुंबई इंडियन्सचा संघ हा पाच वेळा चॅम्पियन राहिला आहे. त्यांना अशा मोठ्या सामन्यात खेळण्याचा जास्त अनुभव आहे. असे असून देखील श्रेयसची दमदार खेळी पाहून दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधआर एबी डिव्हिलियर्सने देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याने जसप्रीत बुमराहच्या यॉर्करवर श्रेयसने खेळलेल्या अफलातून शॉटचे विशेष कौतुक केले आहे.
नेमकं काय झालं?
सामन्यात पंजाब किंग्जची बॅटिंग सुरु असताना 18 व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने जवळपास परफेक्ट यॉर्कर फेकला. दुसरा कोणी खेळाडू असता तर अगदी सहज शक्य होतं की त्याची दांडी उडाली असती, पण श्रेयसकडे पाहिल्यानंतर असं वाटत होतं की तो या चेंडूसाठी तयार होता आणि त्याने कदाचित आयपीयलच्या या हंगामातील सर्वोत्तम शॉट खेळला. त्याने तो चेंडू शॉर्ट थर्ड-मॅनवर उभ्या रीस टॉपली याच्या जवळून टोलवत चौकार मिळवला. श्रेयस अय्यरने खेळलेल्या या शॉटबद्दल बोलताना डिव्हिलियर्सने कबुल केलं की जर तो त्या चेंडूचा सामना करत असता तर त्याचे स्टंप उखडले असते.
एबी डिव्हिलियर्स नेमकं काय म्हणाला?
जिओस्टारवर बोलताना डिव्हिलियर्स म्हणाला की, ”माझ्यासाठी हा ‘शॉट ऑफ द आयपीएल |ञ्च्8217; आहे. हा मिडल स्टंप उडवणारा परफेक्ट यॉर्कर आहेष्ठ. तुम्ही यापासून वाचू शकत नाहीत. मी याचा सामना करत असतो तर त्याने कदाचित माझे स्टंप उडाले असते.”
”जगातील सर्वोत्तम गोलंदाजाविरोधात त्याने चौकार ठोकला आणि मुंबई इंडियन्सवर दबाव टाकला. ष्ठ.अगदी अविश्वसनीय फलंदाजी. कसला अद्धभुत खेळाडू आहे,” अशा शब्दात त्यानं श्रेयसचं कौतुक केलं. या समान्यात श्रेयसने 41 चेंडूत पाच चौकार आणि आठ षटकार ठोकत नाबाद 87 धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर पंजाब किंग्जने सहा चेंडू आणि पाच विकेट्स हातात असताना 204 धावांचा पाठलाग पूर्ण केला. या विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या पंजाब किंग्जचा सामना आता 3 जून रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होणार आहे.
