Spread the love

पुणे / महान कार्य वृत्तसेवा

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा हुंडाबळीची चर्चा सुरू झाली. 51 तोळे सोनं, चांदी, रोख रक्कम दिल्यानंतरही वैष्णवीचा तिच्या सासरच्यांकडून छळ सुरू होता. अत्यंत थाटामाटात पार पडलेल्या या लग्नाचा अवघ्या दोन ते तीन वर्षांत दुर्दैवी अंत झाला. मात्र, त्यानंतर वैष्णवीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यामध्ये तिचं तिच्या नवऱ्यावर किती प्रेम होतं, हे स्पष्ट होतंय. तिने लग्नात क्रूरकर्मा नवरा शशांक हगवणेसाठी घेतलेला उखाणाही आता व्हायरल झाला आहे.

वैष्णवी आणि शशांक हगवणे यांचं लग्न पुण्यात अत्यंत थाटामाटात पार पडलं होतं. या लग्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही हजेरी लावली होती. तेथील डामडौल पाहून अजित पवारांनी वैष्णवीच्या वडिलांना हे तुम्ही स्वत:च्या मर्जीने देताय की त्यांनी जबरदस्ती केली म्हणून देताय असा प्रश्नही विचारला होता. या लग्नातील फोटोही आता व्हायरल झालेत. तर वैष्णवीचा उखाणाही व्हायरल झाला आहे.

आता उखाणा घे म्हटल्यावर ती म्हणते, ”चंदेरी थाळी, सोनेरी बटण, शशांकरावांना आवडते चिकन आणि मटण” या उखाण्यानंतर ती गोड हसतेही आणि म्हणते की चिकन लव्हर. तिच्या या उखाण्यातून तिचं शशांकप्रती असलेलं प्रेमच स्पष्ट होतंय. पण व्हिडिओच्या खाली तिच्याप्रती अनेकांनी दु:ख व्यक्त केलंय. या हसऱ्या चेहऱ्यावर शशांकने अत्याचार केलाय, असंही काहींनी म्हटलं आहे.

दरम्यान, वैष्णवी हगवणेचा दिर सुशील हगवणेचीही एक पोस्ट व्हायरल होत आहे. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून त्याबाबतची नोटीस काढण्यात आली होती. राजेंद्र हगवणेकडं पुण्यातलं मुळशी तालुक्यातचं अध्यक्षपद होतं. तर लेक सुशील हगवणे युवक काँग्रेसचा पदाधिकारी होता. या घटनेनंतर नागरिक संताप व्यक्त करत आहेत, दरम्यान, सुशील हगवणेची एक सोशल मिडिया पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली आहे, त्याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लेक आणि सुनेबाबत लिहलं आहे.

सुशीलच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्‌‍स करत आपला राग व्यक्त केला आहे. यावेळी लेकीला नाही तर सुनेला निवडून आणुयाष्ठ.सूना घराबाहेर पडल्या तर स्वत:चं सामाज्य पण उभारू शकतात, सूना सुद्धा इतिहास घडवू शकतात हे जगाला दाखवून देऊयाष्ठ. एक मत सुनेसाठी,’ अशी पोस्ट सुशील हगवणे याने केली होती.