म्हणाली…हाच माझा पती”, मुलाचं कुटुंब पोलीस ठाण्यात
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
आपल्याच मुलीच्या होणाऱ्या नवऱ्याच्या प्रेमात पडून, तिची आई भावी जावयासोबत पळून गेल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी खूप गाजलं होतं. हे प्रकरण संपतं न संपतं तोच आता 35 वर्षीय महिलेचा जीव तिच्या 16 वर्षांच्या भाच्यावर जडल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमधलं हे प्रकरण आहे. या दोघांचे अनैतिक संबंध असून भाचाच माझा पती आहे असं ही महिला म्हणते आहे. त्यामुळे मुलाचं कुटुंब पोलीस ठाण्यात पोहचलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
काही दिवसांपूर्वी मेरठ या ठिकाणी एका महिलेने तिच्या मुलाबाबत न्याय हवा म्हणून पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा त्याच्या मामाकडे दिल्लीला राहतो. तिथे त्याचे आणि त्याच्या 35 वर्षीय मामीचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. आता मामीचं असं म्हणणं आहे की माझा भाचाच माझा पती आहे. यानंतर या मुलाच्या आईने पोलिसांकडे दाद मागितली आहे. पोलिसांनी तक्रार येताच सदर प्रकरणी चौकशी सुरु केली आहे.
मुलाच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार या मुलाच्या वडिलांचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला. कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने या महिलेने तिच्या मुलाला दिल्ली या ठिकाणी त्याच्या मामाकडे पाठवलं. या मुलाचा मामा फ्रिज आणि एसी रिपेरिंगचं काम करतो, हे काम तू शिक म्हणून तिने मुलाला पाठवलं. या महिलेच्या आरोपांनुसार मुलाच्या मामीने त्याचं लैंगिक शोषण सुरु केलं. या गोष्टीला वैतागून मुलगा गावी परतला. त्यावेळी त्याची मामीही लगोलग घरी पोहचली आणि म्हणू लागली की हाच माझा पती आहे. आज तकने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी काय काय म्हटलं आहे? दरम्यान या अल्पवयीन मुलाचं हे म्हणणं आहे की मामीने मला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि माझ्याशी अनैतिक शरीरसंबंध प्रस्थापित केले. माझी मामी दिल्लीत असताना सातत्याने माझं शोषण करत होती. यानंतर या मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार केली आहे. दरम्यान या प्रकरणी मामीचं म्हणणं हे आहे की तो मुलगाच तिचा पती आहे आणि मला त्याच्या बरोबरच राहायचं आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मेरठचे एसपी सिटी आयुष विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे वय 16 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत, हे प्रकरण मिटवण्यासाठी, आता त्याच्या वयाचं प्रमाणपत्र मागितले आहे. ते तपासल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. पोलीस आता या अनैतिक संबंधांच्या गुंत्यात अडकले आहेत. सध्या पोलीस अल्पवयीन मुलाच्या वयाच्या प्रमाणपत्राच्या आधारे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला दिल्लीची रहिवासी आहे. तर अल्पवयीन मुलगा तिच्या पतीचा भाचा आहे आणि तो मेरठमधील दौराळा येथील रहिवासी आहे.
