Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

2025च्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पणानं सर्वांना प्रभावित केल्यानंतर, आलिया भट्ट तिच्या मैत्रिणीच्या लग्नातील फोटोमुळे चर्चेत आली आहे. आता आलिया आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी स्पेनला पोहोचली आहे. आलियाची जवळची मैत्रीण तान्या साहा गुप्ता बॉयफ्रेंड डेविड एंजेलोवबरोबर लग्न करत आहे. त्यामुळे ती आपल्या मैत्रिणीला शुभेच्छा देण्यासाठी स्पेनला पोहोचली आहे. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये बॉलिवूडची ‘गंगुबाई’ तिच्या मैत्रिणीबरोबर लग्नात एंजॉय करताना दिसत आहे. लग्नातील सेलिबेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान एका व्हिडिओमधील आलियाच्या फ्यूजन लूकची खूप प्रशंसा होत आहे.

आलिया भट्ट मित्राच्या लग्नाला गेली : आलिया भट्ट तिच्या गर्ल गँगबरोबर या खास क्षणांचा आनंद घेत आहे. अभिनेत्रीचा लग्नामधील लूक हा पाहण्यासारखा आहे. तिनं लेहेंगाबरोबर जांभळ्या रंगाचा बैंडाना आणि सनग्लासेस घातले आहेत. तिचा हा लूक खूप हटके आहे. यादरम्यान आलियाची जवळची मैत्रीण आकांक्षा रंजन कपूर देखील तिच्याबरोबर लग्नात दिसली. तिनेही लग्नात जांभळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. आता आलियाच्या व्हायरल झालेल्या फोटोच्या पोस्टमध्ये अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टच्या कमेंट विभागात लिहिलं, ‘ती खूप भाग्यवान आहे की, तिचे अजूनही तिच्या शाळेतील मैत्रिणीबरोबरचे नाते खूप घट्ट आहे.’ दुसऱ्या एकानं लिहिलं, ‘ती या कार्यक्रमात खूप आनंदी आणि सुंदर दिसत आहे.’ आणखी एकानं लिहिलं, ‘आलिया ही मला खूप सुंदर वाटते.’

आलिया भट्ट आणि कान फिल्म फेस्टिव्हल : आलियाचं कान फिल्म फेस्टिव्हल 2025मधील लूक खूप सुंदर होतं. या लूकची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. तिचं अनेकांनी कौतुक केलं होतं. कानमध्ये आलियानं बेज रंगाच्या गाऊनमध्ये डेब्यू केला होता. यानंतर तिनं गुच्चीची क्रिस्टल साडी परिधान केली होती, जी अनेकांना आवडली होती. दरम्यान आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती पुढं ‘लव्ह ॲन्ड वॉर’ , ‘इंशाअल्लाह’, तख्त’, ‘अल्फा’ आणि ‘मधुबाला’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.