सुषमा अंधारेंचा अजितदादांना पत्र धाडत गंभीर आरोप
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका होत आहे. हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी हिने राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती, तर वैष्णवीला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागलं नसतं, असा आरोप केला जात आहे. या प्रकरणात महिला आयोगाकडून हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवत विरोधकांनी रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. यानंतर चाकणकर यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांच्या समर्थनार्थ पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलनही करण्यात आलं. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्या समर्थकांकडून फोन करून धमक्या दिल्या जात आहेत, तसेच त्यांचे फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर बदनामी केली जात असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र देखील लिहिलं आहे.
सुषमा अंधारे यांनी पत्रात म्हटले आहे की, रूपाली चाकणकर यांच्या समर्थक गटाकडून अनेक महिलांना धमकीचे आणि अील भाषेतील फोन येत आहेत. काही महिलांना आलेल्या अशा कॉल्सची रेकॉर्डिंग्ज रोहिणी खडसे यांनी वाजवून दाखवल्या. चाकणकर यांच्या समर्थकांनी माझे (सुषमा अंधारे), रोहिणी खडसे, यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांचे फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर अत्यंत गलिच्छ आणि अील भाषेत टीका सुरू केली आहे. मला रुपाली चाकणकरांना काहीही बोलायचं नाही. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आदरणीय अजितदादा पवार यांना एक नम प्रश्न विचारायचा आहे की, ज्यांना आपण महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेसाठी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त केलं, त्याच बाई जर हगवणे प्रकरणात प्रश्न विचारला म्हणून त्यांच्या या ब्लॅकमेलर गँगमार्फत इतक्या गलिच्छ पद्धतीने आमच्यावर टिप्पणी करत असतील तर आम्ही न्याय आता कुणाकडे मागायचा? असं सवाल सुषमा अंधारे उपस्थित केला आहे. आता यावर अजित पवार काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
