मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलले महायुती सरकारचे बहुचर्चित खातेवाटप अखेर जाहीर झाले. गृह खाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे. तसेच ऊर्जा खात्याची जबाबदारीही त्यांच्याकडेच सोपवली गेली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पूर्वीचेच अर्थ खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
असे असणार मंत्रीमंडळ
गृह व ऊर्जा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नगरविकास : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अर्थ : उपमुख्यमंत्री अजित पवार
सार्वजनिक बांधकाम : शिवेंद्रराजे भोसले
महसूल : चंद्रशेखर बावनकुळे
उद्योग : उदय सामंत
माती व पाणी परीक्षण : संजय राठोड
पाणीपुरवठा : गुलाबराव पाटील
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण : प्रकाश आबीटकर
वैद्यकीय शिक्षण : हसन मुश्रीफ
रोजगार हमी : भरतशेठ गोगावले
अन्न व औषध प्रशासन : नरहरी झिरवळ
उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कामकाज : चंद्रकांत पाटील
पर्यावरण : पंकजा मुंडे
महिला व बालविकास : आदिती तटकरे
क्रीडा : दत्ता भरणे
जलसंधारण : राधाकृष्ण विखे-पाटील ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
जलसंधारण ( विदर्भ तापी कोकण विकास) व आपत्ती व्यवस्थापन : गिरीश महाजन
मत्स व बंदरे : निलेश राणे
सहकार : बाबासाहेब पाटील
सामाजिक न्याय : संजय शिरसाट
कृषी : माणिकराव कोकाटे
अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण : धनंजय मुंडे
मदत व पुनर्वसन : मकरंद पाटील
कामगार : आकाश फुंडकर
वन : गणेश नाईक
शालेय शिक्षण : दादा भुसे
कौशल्य विकास, रोजगार उद्योग व संशोधन : मंगलप्रभात लोढा
परिवहन : प्रताप नाईक
विपणन व प्रोटोकॉल : जयकुमार रावल
ओबीसी विकास, दुग्ध विकास, ऊर्जा नुतनीकरण : अतुल सावे
अदिवासी विकास : अशोक उईके
पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण : शंभूराज देसाई
माहीती तंत्रज्ञान : आशिष शेलार
वस्त्रोद्योग : संजय सावकारे
ग्रामविकास : जयकुमार गोरे
राज्यमंत्री
सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण : माधुरी मिसाळ
अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय : आशिष जयस्वाल
सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा : मेघना बोर्डीकर
उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन : इंद्रनील नाईक
गृहराज्य शहर : योगेश कदम
गृहनिर्माण : पंकज भोयर